शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

यंदा देवगिरीवर कोण ?

By admin | Updated: November 5, 2014 00:59 IST

राज्यात प्रथमच सत्तारूढ झालेल्या भाजपप्रणीत सरकारचे पहिले हिवाळी अधिवेशन डिसेंबर महिन्यात होणार असून यावेळी ते तीन आठवड्याचे राहण्याची शक्यता आहे, तसे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

विधिमंडळ अधिवेशन: कालावधी वाढण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेतनागपूर: राज्यात प्रथमच सत्तारूढ झालेल्या भाजपप्रणीत सरकारचे पहिले हिवाळी अधिवेशन डिसेंबर महिन्यात होणार असून यावेळी ते तीन आठवड्याचे राहण्याची शक्यता आहे, तसे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. दरम्यान सध्याच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रिपद नसल्याने त्यांच्यासाठी राखीव देवगिरी बंगला कोणत्या मंत्र्याला मिळतो याकडेही लक्ष लागले आहे.नागपूर कराराप्रमाणे ठरलेल्या कार्यकाळानुसार म्हणजे सहा आठवडे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये चालावे ही मागणी विरोधी पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष प्रत्येक अधिवेशनात करीत आला आहे. खुद्द फडणवीस यांनी आमदार म्हणूनही ही मागणी वेळोवेळी केली आहे. आता भाजपचीच सत्ता आहे आणि फडणवीस मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे आघाडी सरकारच्या तुलनेत यावेळी अधिवेशनाचा कार्यकाळ अधिक असेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारणा केल्यावर त्यांनी अतिशय कौशल्याने कार्यकाळाच्या मुद्यावर बोलणे टाळले. मात्र अधिवेशनासाठी तयार होणाऱ्या विषय पत्रिकेवरील शेवटचा विषय चर्चेला येईपर्यंत अधिवेशन चालणार, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र कार्यकाळ वाढविण्याबाबत आतापर्यंत भाजपचीच आग्रही भूमिका राहात आली आहे. दोनच आठवड्यात अधिवेशन गुंडाळल्यास आघाडी सरकार व भाजप सरकार यांच्यात फरक काय, अशी टीका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे किमान तीन आठवडे तरी अधिवेशन चालावे यादृष्टीने कामकाजाचे स्वरूप ठरविण्याबाबत गांभीर्याने विचार होत असल्याची माहिती आहे. असे झाल्यास यंदा अधिवेशनाचा कार्यकाळ वाढू शकतो.दरम्यान अधिवेशन आले की मंत्र्यांच्या बंगल्याची चर्चा सुरू होते. युती शासनापासून तर आघाडी शासनापर्यंत तब्बल २० वर्षे नागपूरमधील देवगिरी बंगला उपमुख्यमंत्र्यासाठी राखीव ठेवला जातो. सध्याच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री नाही. शिवसेनेने हे पद मागितले असले तरी भाजपची ते देण्याची इच्छा नाही. त्यामुळे अधिवेशनाच्यापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तरी उपमुख्यमंत्री कोणी होईल याची शक्यता धूसर आहे. त्यामुळे यावेळी देवगिरीवर मुक्काम कोणाचा हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. गृहमंत्र्यांकडे हा बंगला जाऊ शकतो. पण हे खातेसुद्धा सध्यातरी मुख्यमंत्र्यांकडेच आहे. त्यामुळे अर्थ किंवा महसूल मंत्री या बंगल्यासाठी प्रयत्न करू शकतात, अशी माहिती आहे.(प्रतिनिधी)रविभवनातील आरक्षण बंदअधिवेशनासाठी बंगल्याची दुरुस्ती करायची असल्याने १ नोव्हेंबर पासून रविभवनातील तसेच आमदार निवासातील खोल्यांचे आरक्षण बंद करण्यात आले आहे. यावेळी सर्व मंत्रिमंडळच नवीन असल्याने रविभवनात कोण कुणाचे शेजारी राहणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. मंत्र्यांच्या बंगल्यावर किती खर्च होणार याकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे. कारण मंत्र्यांच्या बंगल्यावर होणाऱ्या खर्चावर भाजपने यापूर्वी टीका केली आहे हे येथे उल्लेखनीय.