शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

... हा तर वेळकाढूपणा

By admin | Updated: April 6, 2017 05:10 IST

शेतकरी कर्जमाफीचे मॉडल तपासायला उत्तरप्रदेश सरकार कोणाकडे गेले होते? हा तर निव्वळ वेळकाढूपणा आहे. कर्जमाफी कशी करायची

मुंबई : शेतकरी कर्जमाफीचे मॉडल तपासायला उत्तरप्रदेश सरकार कोणाकडे गेले होते? हा तर निव्वळ वेळकाढूपणा आहे. कर्जमाफी कशी करायची, याची माहिती राज्य सरकारला हवी असेल तर त्यांनी आम्हाला विचारावे. आम्ही सांगू कर्जमाफी कशी करायची, अशा शब्दात विरोधकांनी बुधवारी राज्य सरकारचा समाचार घेतला. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या निवासस्थानी विरोधकांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. भाजपा उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांना ३६ हजार कोटी देते. मग महाराष्ट्रातील शेतकऱ्यांशीच यांचा ३६ चा आकडा का, असा सवाल करत विखे-पाटील यांनी युपी मॉडेलचा अभ्यास करण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयावर टीका केली. संघर्ष यात्रेबाबत बोलताना विखे पाटील म्हणाले की, संघर्ष यात्रेमुळे आपण सरकारला कर्जमाफी करण्यासाठी भाग पाडू शकतो, असा विश्वास शेतक-यांमध्ये निर्माण झाला आहे. दुस-या टप्प्यात संघर्ष यात्रा राजमाता जिजाबार्इंचे जन्मस्थान असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजापासून सुरू होईल. ही यात्रा १५ ते १८ एप्रिल दरम्यान चार दिवसात बुलडाणा, जळगाव, धुळे, नंदूरबार, नाशिक आणि पालघर जिल्ह्यांमधून मार्गक्रमण करणार आहे.अजित पवार म्हणाले, सरकारने कर्जमाफीसाठी अभ्यास करण्याची सबब सांगू नये. सरकारची इच्छाशक्ती असेल तर कर्जरोखे काढूनही शेतकरी कर्जमाफी शक्य आहे. यापूर्वी सरकारने कृष्णा खो-यासाठी रोखे काढले होते, याची आठवण त्यांनी करून दिली. महाराष्ट्राच्या तुलनेत कमी आर्थिक क्षमता असलेले राज्य कर्जमाफीचे निर्णय घेतात. परंतु, येथील सरकारला शेतक-यांचे सोयरसूतकच राहिलेले नाही, असा ठपका त्यांनी ठेवला. पृथ्वीराज चव्हाण यांनी उत्तर प्रदेश पॅटर्नवरील कर्जमाफी महाराष्ट्राला मान्य नसल्याचे म्हटले. उत्तर प्रदेशात केवळ एक लाख रूपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय झाला आहे. परंतु, महाराष्ट्रात अशी कोणतीही मयार्दा घालून कर्जमाफी स्वीकारली जाणार नाही, असे सांगितले. यावेळी , धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आदी नेते उपस्थित होते. (प्रतिनिधी)