शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

२०१९ पर्यंत महाराष्ट्र टंचाईमुक्त

By admin | Updated: December 6, 2014 02:26 IST

दुष्काळ निवारणाच्या वेगवेगळ्या योजना जलयुक्त शिवार अभियानांतर्गत एकत्रितपणे राबवून २०१९ पर्यंत महाराष्ट्र टंचाईमुक्त करण्याचा निर्धार शासनाने केला आहे,

मुंबई : दुष्काळ निवारणाच्या वेगवेगळ्या योजना जलयुक्त शिवार अभियानांतर्गत एकत्रितपणे राबवून २०१९ पर्यंत महाराष्ट्र टंचाईमुक्त करण्याचा निर्धार शासनाने केला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत ग्रामविकास व जलसंधारण विभागामार्फत टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९, या विषयावर सह्याद्री अतिथीगृहावर एकदिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारणाशी संबंधित विविध उपक्रम एकत्रितपणे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राबविण्यात येतील. यासाठी प्रत्येक जिल्ह्याचा आराखडा तयार करून त्या विभागास उपयुक्त असे प्रकल्प हाती घेण्यात येतील. यासाठी निधीची कमतरता राहणार नाही. यात केंद्र शासनाचाही सहभाग वाढविण्यात येणार आहे. या अभियानाचे नियंत्रण मुख्यमंत्री ट्रान्सफॉर्मेशन आॅफिस (सीएमटीओ) मार्फत केले जाईल. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जलसंधारणाची कामे करीत असताना एखादे काम सुरू करण्यापूर्वी व काम पूर्ण झाल्यानंतर त्या कामाचा अक्षांश-रेखांशासह डिजिटल फोटो काढून वेबसाइटवर टाकले जातील़ त्यामुळे काम झाले की नाही, हे लक्षात येणार आहे.प्रकल्प अंमलबजावणीच्या नियमित अहवालाचे परीक्षण, समीक्षण आणि विश्लेषण करण्यात येईल. या सर्व कामांवर नियंत्रणासाठी डिलिव्हरीचेंज फाउंडेशन या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. या परिषदेला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, पोपटराव पवार, जलसंधारण विभागाचे सचिव प्रभाकर देशमुख, संबंधित विभागांचे प्रधान सचिव, सचिव, सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, समाजसेवी संस्था व इतर मान्यवर उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)> वैद्यकीय अध्यापकांना विभागीयसंवर्ग संरचनेतून वगळलेवैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांतील नियुक्त अध्यापकांना पदस्थापना देण्याकरिता विभागीय संवर्ग संरचना व विभागीय संवर्ग वाटप नियमावली २०१० मधून वगळण्यास मान्यता दिली. अध्यापकांची कमतरता असून त्यावर मात करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.