शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
4
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
5
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
6
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
7
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
8
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
9
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
10
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
11
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
12
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
13
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
14
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
15
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
16
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
17
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
18
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
19
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
20
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
Daily Top 2Weekly Top 5

वाघाच्या बछड्याचा भूकबळी

By admin | Updated: October 28, 2014 00:30 IST

रविवारी सकाळी ९ वाजता पशु सहायक आयुक्त एस.एन. निरगुडकर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चित्रा राऊत व शवविच्छेदक गणेश राहाटे यांनी शवविच्छेदनाची कारवाई पार पाडली. त्यानंतर त्याच्यावर अग्नी देऊन

उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील घटना रविवारी सकाळी ९ वाजता पशु सहायक आयुक्त एस.एन. निरगुडकर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चित्रा राऊत व शवविच्छेदक गणेश राहाटे यांनी शवविच्छेदनाची कारवाई पार पाडली. त्यानंतर त्याच्यावर अग्नी देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मुख्य वन संरक्षक श्रीनिवास रेड्डी, उपवनसंरक्षक उत्तम सावंत, वनरक्षक शकील शेख यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या बछड्याला खायला काहीही न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही दिली. ही प्राथमिक माहिती असल्याचेही या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. शवविच्छेदन करून ‘विसेरा’ वैद्यकीय तपासणीकरिता नागपूरला पाठवित आहे याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असेही पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. या बछड्याची उंची ३३ सें.मी. व लांबी ८२ सें.मी. होती. त्याची आई जिवंत असल्यामुळे वन विभागाला या संदर्भात उपाययोजना करण्याची गरज वाटली नाही. चांदी वाघिणीने अन्य चार बछड्यांना जन्म दिल्याने या बछड्याकडे दुर्लक्ष केले, ही बाब वन अधिकाऱ्यांच्या उशिरा लक्षात आली. या परिसरात दुर्गंधी सुटल्याने त्याचा मृत्यू दोन ते तीन दिवसांपूर्वी झाला असावा, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. (तालुका प्रतिनिधी)हा बछडा चांदी या वाघिणीचा असून, तिने दोन महिन्यांपूर्वी चार बछड्यांना जन्म दिला. त्यामुळे तिचे या बछड्याकडे दुर्लक्ष झाले होते. वाघीण दोन ते अडीच वर्षांपर्यंत बछड्यांची काळजी घेत असते. या काळात शिकार कशी करावी, हे शिकवत असते. चांदी वाघिणीने दुसऱ्यांदा बछड्यांना जन्म दिल्याने तिने या बछड्याला सोडून दिले. हा बछडा स्वत: शिकार करून अन्न मिळवू शकला नाही. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. - श्रीनिवास रेड्डी, मुख्य वनसंरक्षक, नागपूर