शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
5
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
6
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
7
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
8
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
9
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
10
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
11
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
12
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
13
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
14
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
15
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
16
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
17
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
18
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
19
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
20
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी

एक लाख फॉलोअर्स तरच तिकीट

By admin | Updated: July 29, 2016 01:43 IST

फेसबुक, टिष्ट्वटरवर तुमचे एक लाखापेक्षा अधिक फॉलोअर्स असतील तर तुमचा खासदारकी, आमदारकीच्या निवडणुकीसाठी प्राधान्याने विचार केला जाईल आणि तोही भाजपामध्ये.

मुंबई : फेसबुक, टिष्ट्वटरवर तुमचे एक लाखापेक्षा अधिक फॉलोअर्स असतील तर तुमचा खासदारकी, आमदारकीच्या निवडणुकीसाठी प्राधान्याने विचार केला जाईल आणि तोही भाजपामध्ये. सोशल मीडियात आपल्या आमदार, खासदारांना सक्रिय करण्यासाठी पक्षामध्ये आता हा फंडा वापरण्यात येत आहे. भाजपाच्या राज्यातील सर्व आमदारांची बैठक गुरुवारी रात्री मंत्रालयासमोरील महिला विकास महामंडळाच्या सभागृहात झाली. त्यात प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी याबाबतची माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षाचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री व्ही. सतीश यांनीही बैठकीत मार्गदर्शन केले. भाजपाच्या खासदार, आमदारांना सोशल मीडियामध्ये किती फॉलोअर्स आहेत याचे मूल्यांकन केले जात आहे. त्यांच्यापैकी किती जणांनी ‘नमो’ अ‍ॅप आपल्या मोबाइलमध्ये आतापर्यंत डाऊनलोड केले याची माहिती मागविण्यात आली आहे. मध्यंतरी महाराष्ट्रातील एका खासदाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर दोन वर्षांतील कार्याचा आढावा मांडला. तेव्हा ‘तुम्ही सोशल मीडियावर अजिबात अ‍ॅक्टीव्ह का नाही?’, असा जाब मोदी यांनी त्या खासदारास विचारल्याचे समजते.केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना आणि त्यांचे फायदे सामान्यांपर्यंत पोहोचविण्यात आमदारांचे योगदान कमी पडत असल्याची जाणीव गुरुवारच्या बैठकीत करून देण्यात आली. या कामासाठीच्या आपल्या योगदानाचेही मूल्यांकन केले जात आहे, असे त्यांना बजावण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जिंकण्यासाठी ‘करा किंवा मरा’च्या इर्षेने कामाला लागण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी या बैठकीत दिले. या यशापयशाचा हिशेब करून मार्च २०१७मध्ये कोणत्या आमदारास कोणती संधी द्यायची हे ठरविले जाईल, असेही सूचित करण्यात आले. (विशेष प्रतिनिधी)