शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

मुंब्रा अग्निशमन केंद्रातून वस्तूंना फुटले पाय

By admin | Updated: October 18, 2016 03:38 IST

२६ जुलै २००५ च्या महापुरात ज्यांचे नुकसान झाले, त्या पूरग्रस्तांसाठी राज्य शासनाकडून पाठवण्यात आले

कुमार बडदे,

मुंब्रा- २६ जुलै २००५ च्या महापुरात ज्यांचे नुकसान झाले, त्या पूरग्रस्तांसाठी राज्य शासनाकडून पाठवण्यात आलेल्या, मात्र वाटप न झालेल्या संसारोपयोगी वस्तूंची तब्बल ११ वर्षांनंतर येथील अग्निशमन केंद्राच्या गोदामामधून पळवापळवी सुरू असल्याचे उघडकीस आले आहे.दि. २६ जुलै २००५ रोजी ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरालाही मुसळधार पर्जन्यवृष्टीचा फटका बसला होता. येथील आंबेडकरनगर, शिवाजीनगर, अमृतनगर, कैलासनगर, रशीद कम्पाउंड इत्यादी ठिकाणच्या नागरी वसाहतींमध्ये पावसाचे पाणी शिरले होते. त्यामध्ये हजारो लोकांच्या संसारोपयोगी वस्तू वाहून गेल्या. त्यांचे संसार परत उभे राहावेत, यासाठी तत्कालीन सरकारने तातडीची मदत म्हणून रोख रक्कम तसेच संसारोपयोगी वस्तूंचे वाटप करण्याचा निर्णय घेतला होता.मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक बादल्या, चटया, पोळपाट-लाटणे तसेच स्टीलची ताटे-वाट्या पाठवण्यात आल्या होत्या. त्यातील अवघ्या २० टक्के साहित्याचेच वाटप करण्यात आले होते. उर्वरित साहित्य मागील ११ वर्षांपासून येथील अग्निशमन केंद्राच्या पहिल्या मजल्यावरील गोदामामध्ये पडून होते. अग्निशमन दलाची ही इमारत धोकादायक ठरवण्यात आल्यामुळे सध्या ती पाडण्याचे काम सुरू आहे. बांधकाम पाडत असताना येथील एका भांडारगृहात शिल्लक साहित्य ठेवण्यात आल्याचे निदर्शनास येताच अग्निशमन दलाच्या काही कर्मचाऱ्यांनी त्याची पळवापळवी सुरू केली. या प्रकरणाची कसून चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.>आधीही झाल्या चोऱ्या यापूर्वीही गोदामाचे कुलूप तोडून पूरग्रस्तांकरिता आलेले साहित्य लांबवण्यात आले होते, अशा माहिती एका कर्मचाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला दिली. येथील जनरेटरची अलीकडेच चोरी झाली होती आणि पुन्हा तो मूळ जागी ठेवण्यात आला होता.