शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकांना खिळवून ठेवणारी पेंडक्याची वाडी

By admin | Updated: October 19, 2016 03:48 IST

खोडाळा-मोखाडा मुख्य रस्त्याच्या वरून ५ ते ६ किमीवर असलेल्या पेंडक्याचीवाडी परिसर विविधतेने नटलेला असून निसर्गाच्या सौंदर्यात भुरळ घालणार आहे.

रविंद्र साळवे,

मोखाडा- मुंबईपासून काही मैलाच्या अंतरावर व खोडाळा-मोखाडा मुख्य रस्त्याच्या वरून ५ ते ६ किमीवर असलेल्या पेंडक्याचीवाडी परिसर विविधतेने नटलेला असून निसर्गाच्या सौंदर्यात भुरळ घालणार आहे. परंतु याकडे शासनाचे दुर्लक्ष राहिले असल्याने स्थानिक आदिवसी नाराज आहेत. पेंडक्याचीवाडी या पाड्यापासून २ किमी अंतरावर पेंडक्याची नदीवर हा निसर्ग सौंदर्यचा खजिना पहावयास मिळतो.३०० ते ४०० फूट उंचीचा बारमाही वाहणारा धबधबा प्राचीन काळातील गुहा व पाणी अडवण्यासाठी बांधण्यात आलेले बंधारे हे सगळी दृष्य बघून मन भारावून जाते. या ठिकाणी असलेल्या प्राचीन गुहेचा वापर त्याकाळी रहदारीसाठी केला जात असावा कारण या गुहेचा मार्ग ८ ते ९ किमी अंतरावरील वाशाळा या गावपाड्याशी जोडला गेला आहे. व येथील असलेला उंच धबधबा हा हजारो फूट खोल असून खोलीचा अंदाज अजून पर्यंत आलेला नाही. या नदीपात्रातील पाणी अडवण्यासाठी प्रयत्न केले गेले असावेत हे अर्धवट स्थितीत बांधण्यात आले असलेल्या बंधाऱ्यावरून लक्षात येते. तसेच या बांधाचा अजूनपर्यंत दगड सुद्धा हाललेला नाही यामुळे या बांधकामाचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. या बाबत अधिक माहितीसाठी येथील जुन्या जाणत्यांशी संपर्क साधला असता पांडवांच्या काळात येथील बांधकाम करण्यात आले असल्याची माहिती मिळाली. या बाबतच्या अनेक सुरस कथाही त्यांनी ऐकवल्या. >काय करायला हवेशासनाने सर्व प्रथम या नदीवरील पूल व रस्त्याची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. या धबधब्याचा परिसर सुशोभीत करायला हवा. या ठिकाणी बारमाही पाणी असल्याने वर्षभर पर्यटकांची रेलचेल असेल. तसेच यातून रोजगार उभा राहिल.