शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

‘स्मार्ट’साठी साडेतीन वर्षे

By admin | Updated: September 22, 2016 03:40 IST

स्मार्ट सिटी योजना पाच वर्षांत मार्गी लावण्याचे प्रस्तावित असले तरी तिसऱ्या यादीत कल्याण-डोंबिवलीचा समावेश झाला आहे.

कल्याण : केंद्र सरकारची स्मार्ट सिटी योजना पाच वर्षांत मार्गी लावण्याचे प्रस्तावित असले तरी तिसऱ्या यादीत कल्याण-डोंबिवलीचा समावेश झाला आहे. त्यामुळे आता केवळ साडेतीन वर्षे शिल्लक राहिले आहेत. परिणामी, सर्वांना एकत्रित घेऊन ही योजना लवकरात लवकर कशी मार्गी लावता येईल, यासाठी आमचा प्रयत्न असेल, असे प्रतिपादन एमएमआरडीएचे आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी बुधवारी केले.‘स्मार्ट सिटी’मधून कल्याण-डोंबिवलीत दोन हजार ३२ कोटींची विकासकामे केली जाणार आहेत. त्यासाठी बुधवारी ‘स्मार्ट सिटी’साठी स्थापन केलेल्या एसपीव्ही कंपनीची बैठक केडीएमसी मुख्यालयात झाली. एमएमआरडीएचे आयुक्त मदान यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक झाली. या वेळी महापौर राजेंद्र देवळेकर, आयुक्त ई. रवींद्रन, प्रांताधिकारी प्रसाद उकिर्डे, पोलीस उपायुक्त डॉ. संजय शिंदे, सभागृह नेते राजेश मोरे, स्थायी समिती सभापती संदीप गायकर, विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर, प्रभारी शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी आदी अधिकारी, पदाधिकारी व कंपनीचे संचालक उपस्थित होते. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मदान यांनी स्मार्ट सिटी योजना कल्याण-डोंबिवलीत राबवण्यासाठी कशा प्रकारे नियोजन केले आहे, याची माहिती दिली. पायाभूत सुविधा व पाणीपुरवठ्यात सुधारणा, घनकचऱ्यावर प्रक्रिया अशा प्रकारची ३० विकासकामे या योजनेंतर्गत एकाच वेळी केली जाणार आहेत. रेल्वे स्थानक परिसरांचा विकास केला जाणार असल्याने रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही या कंपनीत निमंत्रित म्हणून सामावून घेतले जाईल. महापालिका आणि नागरिक यांच्यात चांगला संवाद व्हावा, यासाठी आयटीसंबंधी प्रकल्प हाती घेतला जाईल, असे मदान यांनी स्पष्ट केले. विकासकामांचे विकास आराखडे तयार करण्यासाठी एजन्सी नेमण्यात येणार आहे. सगळ्या कामांची सुरुवात एकत्रित केली जाणार आहे. रिंगरूट प्रकल्प हा देखील या योजनेचा एक भाग आहे. हे काम दोन महिन्यांत सुरू होणार आहे, असे मदान यांनी सांगितले. (प्रतिनिधी) >एमएमआरडीएचा काही प्रकल्पांसाठी निधी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत हाती घेतल्या जाणाऱ्या काही विकासकामांसाठी एमएमआरडीए स्वत: देणार आहे. काही प्रकल्पांसाठी केंद्राचा ५०, तर राज्य आणि महापालिकेचा प्रत्येकी २५ टक्के हिस्सा असेल. >बाधितांचे नियमानुसार पुनर्वसनप्रस्तावित विकासकामांत बाधित होणाऱ्यांचे सरकारी नियमानुसार पुनर्वसन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. शहरे स्मार्ट करण्याचा सरकारचा उद्देश आहे. नागरिकांनाच त्याचा लाभ होईल, असे त्यांनी सांगितले. कामे रखडणार नाहीत पैशांअभावी कोणतीही कामे रखडणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. जलदगतीने कामे मार्गी लागावीत, यासाठी दरमहिन्याला कंपनीची आढावा बैठक होईल, असेही मदान म्हणाले.