शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

पत्रकारांवर हल्ला केल्यास तीन वर्षे कैद

By admin | Updated: April 8, 2017 05:05 IST

पत्रकारावर हल्ला करणाऱ्याला आता तीन वर्षांपर्यंतची कैदेची शिक्षा किंवा ५० हजार रुपयांचा दंड होणार आहे.

मुंबई : पत्रकारावर हल्ला करणाऱ्याला आता तीन वर्षांपर्यंतची कैदेची शिक्षा किंवा ५० हजार रुपयांचा दंड होणार आहे. तसेच हा गुन्हा अजामीनपात्र असणार आहे. मात्र, खोटी तक्रार करणाऱ्या पत्रकारालादेखील तीन वर्षांपर्यंतची शिक्षा किंवा ५० हजार रुपयांचा दंड होणार आहे. यासंबंधीचे विधेयक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत मांडले. विधानसभा आणि विधान परिषदेनेही हे विधेयक एकमताने मंजूर केले. राज्यातील पत्रकारांवर सातत्याने होणारे हल्ले रोखण्यासाठी कायदा करण्यात यावा, अशी मागणी विविध पत्रकार संघटनांनी गेली अनेक वर्षे लावून धरली होती. पत्रकारांवरील हल्ले रोखण्यासाठी कायदा करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द पाळला. शिवाय भाजपा-शिवसेनेच्या सदस्यांनी कोणतीही चर्चा न करता एकमताने विधेयकास मंजुरी दिली. पत्रकारांवरील हल्ला हा दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा मानला जाईल. तो प्रथमश्रेणी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयाकडून चौकशी करण्यायोग्य असेल. या कायद्यानुसार केवळ पत्रकारच नव्हे, तर प्रसारमाध्यम कार्यालय, छापखाना यांनाही संरक्षण मिळाले आहे. म्हणजेच वृत्तपत्र अथवा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या कार्यालयावरील, छापखान्यावरील हल्लादेखील या कायद्याअंतर्गत गुन्हा असेल. संपादक, वृत्तसंपादक, उपसंपादक, वार्ताहर, प्रतिनिधी, व्यंगचित्रकार, वृत्तछायाचित्रकार, दूरचित्रवाणी कॅमेरामन, अग्रलेखक, प्रसंगविशेष लेखक, संहिता तपासनीस, मुद्रितशोधक यांना हे संरक्षण मिळणार आहे. (विशेष प्रतिनिधी)>खोटी तक्रार करणाऱ्या पत्रकारालाही शिक्षाखोटी तक्रार करून एखाद्या प्रकरणात कोणाला गोवण्याचा प्रयत्न पत्रकाराच्या अंगलट येणार आहे. कारण, त्याची तक्रार खोटी होती असे लक्षात आले तर त्यालाही तीन वर्षांपर्यंतची शिक्षा किंवा ५० हजार रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकेल. अशा पत्रकारास सर्व प्रकारच्या शासकीय लाभापासून कायमचे वंचित करण्यात येईल.