शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
4
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
5
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
6
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
7
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
8
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
9
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
10
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
11
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
12
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
13
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
14
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
16
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
17
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
18
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
19
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
20
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
Daily Top 2Weekly Top 5

बलवासह तिघांचे वॉरंट रद्द

By admin | Updated: May 26, 2016 01:47 IST

महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी आरोपी असलेले असीफ बलवा, विनोदकुमार गोयंका आणि संजय काकडे यांच्यावर काढलेले अजामीनपात्र वॉरंट विशेष प्रिव्हेन्शन आॅफ मनी लॉड्रिंग अ‍ॅक्ट

मुंबई : महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी आरोपी असलेले असीफ बलवा, विनोदकुमार गोयंका आणि संजय काकडे यांच्यावर काढलेले अजामीनपात्र वॉरंट विशेष प्रिव्हेन्शन आॅफ मनी लॉड्रिंग अ‍ॅक्ट (पीएलएमए) बुधवारी रद्द केले. तसेच माजी सार्वजनिक बांधकाममंत्री व घोटाळ्यातील मुख्य आरोपी छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांची न्यायालयीन कोठडी ७ जूनपर्यंत वाढवण्यात आली. तर दुसरीकडे उच्च न्यायालयाने पंकज भुजबळ यांच्यासह १४ जणांना ७ जूनपर्यंत अंतरिम दिलासा दिला आहे. महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी २७ एप्रिल रोजी विशेष न्यायालयाने ४३ जणांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले. त्यामध्ये बलवा ग्रुपचे असीफ बलवा, डी.बी. रिअ‍ॅल्टीचे महाव्यवस्थापक विनोद गोएंका, बांधकाम व्यावसायिक संजय काकडे यांनी अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्यासाठी विशेष न्यायालय, त्यानंतर उच्च न्यायालय आणि पुन्हा विशेष न्यायालयात धाव घेतली. बुधवारच्या सुनावणीवेळी विशेष न्यायालयाने या तिघांनाही दिलासा देत त्यांच्याविरुद्ध जारी करण्यात आलेले अजामीनपात्र वॉरंट रद्द केले. मात्र ६ जून रोजी या सर्वांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले. तसेच बुधवारी या घोटाळ्यातील मुख्य आरोपी छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांची न्यायालयीन कोठडी संपली. त्यामुळे विशेष न्यायालयाने या दोघांच्याही कोठडीत ७ जूनपर्यंत वाढ केली. (प्रतिनिधी) पंकज भुजबळांसह चौदा जणांना दिलासाविशेष न्यायालयाने जारी केलेल्या अजामीनपात्र वॉरंटला पंकज भुजबळ यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. पंकज भुजबळ यांच्याबरोबर सत्येन केसरकर, राजेश धारप, निमेश बेंद्रे, तन्वीर शेख आणि संजय जोशी यांनी अजामीनपात्र वॉरंटला आव्हान दिले आहे तर प्रवीणकुमार जैन, चंद्रशेखर सारडा, संजीव जैन, राजेश मिस्त्री, विपुल करकरिया, जगदीश पुरोहित, शैलेश मेहता व सुरेश जजोडिया यांनी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली.या सर्व याचिकांवरील सुनावणी न्या. शालिनी फणसाळकर - जोशी यांच्यापुढे होती. खंडपीठाने या सर्वांना ७ जूनपर्यंत अंतरिम दिलासा दिला आहे. त्यामुळे ७ जूनपर्यंत ईडी यांना ताब्यात घेऊ शकत नाही.