शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

लिफ्टच्या बहाण्याने लुटणाऱ्या तिघांना अटक

By admin | Updated: February 5, 2017 22:09 IST

प्रवासी वा लिफ्टच्या बहाण्याने कारमध्ये बसवून घेतलेल्या प्रवाशास मारहाण करून लुटणारे गजाआड

ऑनलाइन लोकमत

नाशिक, दि. 5 - द्वारका सर्कलजवळून प्रवासी वा लिफ्टच्या बहाण्याने कारमध्ये बसवून घेतलेल्या प्रवाशास मारहाण करून लुटणारे पिंपळगाव बसवंत येथील तीन सराईत गुन्हेगारांना नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने नांदगाव परिसरातून शनिवारी (दि़४) रात्रीच्या सुमारास अटक केली़ ओझर, पिंपळगाव तसेच नाशिकमध्ये केलेल्या चार गुन्ह्यांची संशयितांनी कबुली दिली असून त्यांच्याकडून अल्टो कार, चोरीचे मोबाईल व रोकडसह २ लाख ६६ हजार ३७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़प्रवाशांना लुटणारे संशयित लाल रंगाच्या अल्टो कारमधून मनमाड- नांदगाव रोडने येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांना मिळाली होती़ त्यानुसार त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचाऱ्यांना पेटोलिंगचे आदेश दिले होते़ त्यानुसार पोलीस कर्मचारी शनिवारी रात्री नांदगाव पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना लाल रंगाची अल्टो कार (एमएच ०६ एबी ४६७) संशयास्पदरित्या जात असल्याचे आढळून आले व त्यांनी या कारचा पाठलाग करून हॉटेल खूशबू गार्डनजवळ कारसह तिघा संशयितांना ताब्यात घेतले़.पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या अल्टो कारमध्ये सराईत गुन्हेगार प्रतीक पांडुरंग मातेरे (रा. संतोषी माता नगर, पिंपळगाव बसवंत), रोहित केशव गायकवाड (रा. शिवाजी नगर, पिंपळगाव बसवंत) व रवींद्र दादाश्री केदारे ( रा. पिंपळगाव एमआयडीसी, गोंडेगाव) हे तिघे होते़ त्यांच्याकडून लाल रंगाची अल्टो कार (एमएच ०६ एबी ४६७), चोरीचे ६ मोबाईल, १५,३७० रुपयांची रोकड व हत्यारे असा २ लाख ६६ हजार ३७० रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे़.ओझर, पिंपळगाव व नाशिक शहरातील भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत दोन लुटीचे गुन्हे केल्याची कबुली या तिघा संशयितांना पोलिसांकडे दिली आहे़ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्र रणमाळे, बालाजी मुसळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक अरूण पगारे, हवालदार किरण मोरे, रविंद्र वानखेडे, कैलास देशमुख, संजय पाटील, मुशीर सय्यद, विष्णू जुंदरे, राजू पाटील, जेक़े़सूर्यवंशी, पोलीस शिपाई हेमंत गिलबिले, गणेश नरोटे, प्रदीप बहिरम, मंगेश गोसावी यांनी ही कारवाई केली.