शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पुलावर कार आदळून तिघे ठार

By admin | Updated: March 14, 2017 21:48 IST

भरधाव वेगाने जाणारी कार पुलावर आदळून झालेल्या अपघातात ३ जण जागीच ठार झाले.

लोकमत आॅनलाईनअहमदनगर, दि. 14 - भरधाव वेगाने जाणारी कार पुलावर आदळून झालेल्या अपघातात ३ जण जागीच ठार झाले. सोमवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील खांडगाव शिवारातील नाशिक- पुणे राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात घडला. मयतापैकी दोघे संगमनेरचे व एक जामखेड तालुक्यातील आरणगावचा आहे.

संकेत संजय बोरा (वय १९) रा. आरणगाव , ता. जामखेड , प्रथमेश विष्णू भिंगारे (वय १९ ) रा.इंदिरादगर, संगमनेर व आदित्य श्रीगोपाळ तिवारी (वय १८, रा. देवाचा मळा, संगमनेर) असे ठार झालेल्या युवकांची नावे आहेत. हे तिघे पुणे येथे शिकत असून ते पुण्याहून संगमनेरकडे फियाट पुंटो कारने(क्र. एम.एच.२९ आर. ५४२५) येत होते. नाशिक -पुणे राष्ट्रीय महामार्गावरुन येताना वाहनचालकास रस्त्याचा अंदाज न आल्याने त्यांची कार रस्त्यावरील पुलाच्या भिंतीवर आदळली. या अपघातात संकेत व प्रथमेश दोघे जण गाडीतच अडकून पडले. त्यांचे मृतदेह परिसरातील गणेश राक्षे,मनोज राक्षे, संतोष मांडेकर , अभिषेक गुंजाळ, सुनिल ढगे या युवकांनी गाडीचा दरवाजा तोडून बाहेर काढले. तिसरा आदित्य तिवारी हा पुलालगत पडलेला होता. तिघांनाही मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघातात कारचे मोठे नुकसान झाले.

अपघाताची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक विनय सरवदे सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांसह त्वरित घटनास्थळी पोहचले. त्यांनी अपघाताचा पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. शोकाकूल वातावरणात मंगळवारी दुपारी संगमनेरच्या दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)