शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेत लुटमारी करणारे तिघे अटकेत

By admin | Updated: September 18, 2016 01:49 IST

रात्रीच्या वेळी रेल्वेत लुटमारी करणाऱ्या तिघांना रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.

नवी मुंबई : रात्रीच्या वेळी रेल्वेत लुटमारी करणाऱ्या तिघांना रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. तिघेही नेरुळचे राहणारे असून रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही बंद असल्याची संधी साधत ते हा प्रकार करत होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी एका प्रवाशाला लुटल्यानंतर चालत्या रेल्वेतून खाली फेकून दिले होते.ट्रान्स हार्बर रेल्वेमार्गावर प्रवाशांना लुटीच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. रात्री वेळी रेल्वे स्थानक आवारात तसेच रेल्वेत एकट्या प्रवाशाला मारहाण करुन लुटणाऱ्या टोळ्या सक्रीय झाल्या आहेत. २० आॅगस्ट रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास गिरीधारी मसंता (४५) यांना लुटून चालत्या रेल्वेतून खाली फेकून देण्यात आले होते. याप्रकरणी तपास सुरु असतानाच ९ सप्टेंबर रोजी रात्रीच्या वेळी नेरुळ स्थानकालगत एका पादचाऱ्याला काहीजण लुटत होते. चाकूचा वार करुन ही टोळी प्रवाशाला लुटून पळण्याच्या प्रयत्नात होती. तेवढ्यात काही प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार एक जण पोलीसांच्या हाती लागला होता. अधिक चौकशीत त्याच्या इतर दोघा सहकाऱ्यांची माहिती मिळताच त्यांना हिंगोली येथून पकडण्यात आले. यावेळी त्यांच्याकडे मसंता यांची सोन्याची चैन व अंगठी आढळून आली. तसेच त्यांनी मसंता यांना लुटून रेल्वेतून फेकून दिल्याची कबुली देखील दिली. तिघेही नेरुळचे राहणारे असून स्थानकाबाहेर संध्याकाळी भाजी विक्रीचे काम करायचे. यानिमित्ताने स्थानकात ये-जा करताना काही ठिकाणचे सीसीटीव्ही बंद असल्याची माहिती त्यांनी मिळवली होती. त्यानुसार नेरुळ स्थानकातून रेल्वेने प्रवास करताना एकट्या प्रवाशा गाठून ते लुटायचे. (प्रतिनिधी)