शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

वीज प्रकल्पातील दुर्घटनेत तीन ठार

By admin | Updated: October 8, 2016 04:40 IST

औष्णिक वीज प्रकल्पात बॉयलर उभारताना झालेल्या दुर्घटनेत लोखंडी अँगल कोसळून तीन मजूर जागीच मृत्युमुखी पडले

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्याच्या आहेरवाडी शिवारात उभारण्यात येत असलेल्या औष्णिक वीज प्रकल्पात बॉयलर उभारताना झालेल्या दुर्घटनेत लोखंडी अँगल कोसळून तीन मजूर जागीच मृत्युमुखी पडले, तर अनेक जण गंभीर जखमी झाले. ही दुर्घटना शुक्रवारी सकाळी साडेअकराला घडली़ या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली़सोलापूर शहरापासून अवघ्या १५ किलोमीटर अंतरावर आहेरवाडी-फताटेवाडी परिसरात ‘एनटीपीसी’तर्फे औष्णिक वीज प्रकल्प उभारला जात आहे़ शुक्रवारी सकाळी ११च्या सुमारास युनिट २मध्ये बॉयलर उभारणीचे काम सुरू होते़ या वेळी काही मजूर दोरीच्या साहाय्याने बॉयलर उभा करण्याचा प्रयत्न करीत असताना दोरी तुटल्याने बॉयलरचा मुख्य ढाचा ढासळला, त्यात एकामागोमाग एक लोखंडी अँगल खाली काम करीत असलेल्या मजुरांच्या अंगावर कोसळले़ यात राजबेर सिंग (२४, रा़ बिहार), गुरुप्रीतसिंग (२४, रा़ लोहार, पंजाब) आणि गुरुसेवक सिंग (१९) यांचा मृत्यू झाला़ पालकमंत्री विजयकुमार देशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षक वीरेश प्रभ आदींनी घटनास्थळाची पाहणी केली. याबाबत वळसंग पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते़ (प्रतिनिधी)>चौकशीसाठी मुंबईचे पथक : या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी मुंबईहून तज्ज्ञांचे एक पथक सोलापुरात येणार आहे़ या समितीत चार जणांचा समावेश असणार आहे़