शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

तीन वनरक्षकांना नक्षल्यांकडून जबर मारहाण

By admin | Updated: May 4, 2016 20:52 IST

भामरागड वनपरिक्षेत्राच्या जंगल परिसरात लागलेल्या वणव्याचे क्षेत्र मोजण्यासाठी गेलेल्या तीन वनरक्षकांना अज्ञात नक्षल्यांनी जबर मारहाण केल्याची घटना बुधवारी घडली.

ऑनलाइन लोकमतगडचिरोली, दि. 3-  भामरागड वनविभागस्थित आलापल्लीअंतर्गत भामरागड वनपरिक्षेत्राच्या जंगल परिसरात लागलेल्या वणव्याचे क्षेत्र मोजण्यासाठी गेलेल्या तीन वनरक्षकांना अज्ञात नक्षल्यांनी जबर मारहाण केल्याची घटना बुधवारी घडली.सी. जी. गुरनुले, डी. एम. देवकर्ते व आर. डी. हिचामी हे तीन वनरक्षक भामरागड वनपरिक्षेत्राच्या हद्दीतील जंगलाला लागलेल्या वणव्याचे क्षेत्र मोजण्यासाठी गेले होते. दरम्यान त्यांची काही सशस्त्रधारी अज्ञात नक्षल्यांशी भेट झाली. या नक्षल्यांनी सर्वप्रथम वनरक्षकांकडे असलेले शासकीय भ्रमणध्वनी संच आपल्या ताब्यात घेतले. त्यानंतर तिघांनाही जबर मारहाण करून त्यांच्या मोबाईलमधील डाटा नष्ट करून त्यांना त्यांचे मोबाईल परत केले. त्यानंतर ‘जंगलात कामे करू नका’, असा दमही या वनरक्षकांना त्यांनी दिला. सदर घटनेची माहिती सहायक वनसंरक्षक एम. एस. पचारे यांना मिळताच त्यांनी आपल्या काही कर्मचाºयांसह भामरागड येथे जाऊन मारहाण झालेल्या या तिनही वनरक्षकांना उपवनसंरक्षक यांच्या कार्यालयात भेट घेण्यास आणले. मात्र यावेळी उपवनसंरक्षक कार्यालयात नसल्याने त्यांना घडलेल्या या प्रकाराची भ्रमणध्वनीवर माहिती देण्यात आली.  बुधवारी रात्री उशिरा १० वाजेपर्यंत भामरागडचे उपवनसंरक्षक चंद्रशेखर बाला हे सदर वनरक्षक कर्मचाºयांची भेट घेणार असल्याचे समजते. वृत्त लिहिस्तोवर या घटनेची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली नव्हती.सध्या दक्षिण गडचिरोलीमध्ये १ ते ३१ मे पर्यंत विस्थापन विरोधी जनआंदोलन तीव्र करण्याचे आवाहन नक्षल्यांनी काही ठिकाणी  लावलेल्या बॅनरमधून केले आहे. अनेक वर्षानंतर नक्षल्यांनी वनकर्मचाºयांना टार्गेट केल्याने वनकर्मचाºयांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (प्रतिनिधी)