शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

तीन शेतकऱ्यांच्या विदर्भात आत्महत्या

By admin | Updated: September 11, 2016 04:03 IST

नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून विदर्भातील अमरावती, यवतमाळ आणि भंडारा जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले.

अमरावती / यवतमाळ / भंडारा : नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून विदर्भातील अमरावती, यवतमाळ आणि भंडारा जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले.अमरावती येथील नया अकोला गावात संदीप पांडुरंग कांडलकर (३३) या युवा शेतकऱ्याने शनिवारी दुपारी विषप्राशन करून आत्महत्या केली. संदीप याच्याकडे सहा एकर शेती होती. पिकांसाठी त्याने स्टेट बँकेकडून दीड लाखांचे कर्ज घेतले होते. मात्र, यंदाही पावसाने दडी मारल्याने सोयाबीनचे पीक नष्ट झाले. पुन्हा कर्ज कोणाकडे मागायचे, या विवंचनेत त्याने विषप्राशन केल्याचे नातेवाईकांनी सांगितले.यवतमाळ जिल्ह्याच्या बाभूळगाव तालुक्यातील महंमदपूर येथे प्रभाकर जगन्नाथ मुंडले (५०) यांनी शुक्रवारी विषप्राशन करून आत्महत्या केली. डोक्यावरील कर्ज फेडायचे कसे या चिंतेतूनच त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जाते. भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे अनिल रिनायत (३७) शेतकऱ्याने सततची नापिकी व कर्ज फेडण्याच्या विंवचनेतून बुधवारी ओहोळात उडी घेऊन आत्महत्या केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)