शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई विमानतळाजवळ ड्रोन उडवणा-या तिघांना अटक

By admin | Updated: October 20, 2016 09:59 IST

मुंबई विमानतळाजवळ ड्रोन विमान उडवल्या प्रकरणी तिघा जणांना अटक करण्यात आली आहे.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २० - मुंबई विमानतळाजवळ ड्रोन कॅमे-याचे विमान उडवल्या प्रकरणी तिघा जणांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्यांच्याकडून दोन ड्रोन  कॅमेरे आणि एक आयपॅड जप्त केला आहे. दोन दिवसांपूर्वी मंगळवारी इंडिगो विमानाच्या वैमानिकाला विमानाचे लँण्डीग करताना मुंबई विमानतळाजवळ एक संशयास्पद ड्रोन दिसले होते. 
 
या वैमानिकाने तात्काळ विमानतळ प्रशासनाला याची माहिती दिली. चारकोप पोलिसांनी याप्रकरणी राहुल राजकुमार जैस्वाल (२४), राणा सुभाष सिंह (२५) आणि विधिचंद जैसवाल (४५) अशी तिघांना अटक केली आहे. चित्रपटाच्या शूटींगासाठी राहुल जैस्वाल आणि सुभाष सिंहने कॅमेरा असलेले ड्रोन विमान उडवल्याचे चौकशीतून समोर आले. चित्रीकरणाच्या नियोजित तारखेआधी ते शूटसाठी ड्रोनची ट्रायल घेत होते. विधिचंद जैस्वाल यांचा चित्रपटाच्या शूटींगसाठी ड्रोन कॅमेरे भाडयावर देण्याचा व्यवसाय आहे.
 
भारताने पाकव्याप्त काश्मिरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर मुंबई पोलिसांनी खबरदारी म्हणून मुंबईत ड्रोन विमानाच्या उड्डाणावर बंदी घातली आहे. इंडिगोचे दिल्ली-मुंबई विमान लँड करायला काही मिनिटे असताना संध्याकाळी ५.५५ च्या सुमारास इंडिगोच्या वैमानिकाने हे ड्रोन पाहिले होते.
 
निळया आणि गुलाबी रंगाचे हे ड्रोन असल्याची माहिती वैमानिकाने दिली होती. सरकारी यंत्रणांना ड्रोन विमान वापरण्याची परवानगी आहे. पण हवाई सुरक्षेच्या दृष्टीकोनातून विमानतळ किंवा विमानाजवळ ड्रोन उड्डाणावर बंदी आहे.