शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

दोन भावांसह तीन आरोपी ३१ वर्षांनी खुनातून निर्दोष

By admin | Updated: December 10, 2015 03:08 IST

धंद्यातील वैमनस्यावरून ३१ वर्षांपूर्वी अंधेरी (प.) येथील अदिल रशिद या तरुणाच्या खून प्रकरणी खेरवाडी पोलिसांनी दाखल केलेल्या खटल्यातून उच्च न्यायालयाने, संशयाचा फायदा देत

मुंबई : धंद्यातील वैमनस्यावरून ३१ वर्षांपूर्वी अंधेरी (प.) येथील अदिल रशिद या तरुणाच्या खून प्रकरणी खेरवाडी पोलिसांनी दाखल केलेल्या खटल्यातून उच्च न्यायालयाने, संशयाचा फायदा देत, दोन भावांसह तीन आरोपींची अपिलात निर्दोष मुक्तता केली.नॅशनल पार्कमध्ये सहलीला जातो असे सांगून ढाकेधाके कॉलनी, एस. व्ही.रोड, अंधेरी (प.) येथील राहत्या घरातून १५ नोव्हेंबर १९८४ रोजी बाहेर पडलेल्या अदिल रशिदचा मृतदेह दुसऱ्या दिवशी ठाणे जिल्ह्याच्या पालघर तालुक्यातील दुर्वेश गावी पांडु पराडे या गावकऱ्यास प्रातर्विधीसाठी गेला असताना आढळला होता. आधी अदिल हरवल्याची तक्रार देणाऱ्या रझिया सुलताना या अदिलच्या बहिणीने खुनाचा संशय व्यक्त करणारी फिर्याद नोंदविल्यानंतर पोलिसांनी सईद अहमद हाजी अब्दुल रझाक मिस्त्री, झहीर व जमील ही त्यांची दोन मुले आणि उत्तर प्रदेशातील मेरठ येथील अब्दुल वाजीद ऊर्फ गुड्डु ऊर्फ अब्दुल जब्बार अब्दुल गनी शेखअशा चार आरोपींविरुद्ध खटला दाखल केला होता. सत्र न्यायालयाने मार्च १९९५ मध्ये चौघांनाही जन्मठेप ठोठावली होती. त्याविरुद्ध चारही आरोपींनी केलेले अपील गेली २० वर्षे उच्च न्यायालयात प्रलंबित होते. दरम्यान आरोपी सईद अहमद मिस्त्री यांचे निधन झाले. न्या. बी. पी. धमार्धिकारी व न्या. अजय गडकरी यांच्या खंडपीठाने अंतिम सुनावणीनंतर झहीर, जमील व अब्दुल वाजीद या तिन्ही आरोपींची सर्व आरोपांतून पूर्णपणे निर्दोष मुक्तता केली.या खटल्यात अभियोग पक्षाने २१ साक्षीदार तपासले असले तरी तो प्रामुख्याने परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित आहे. विशेषत: खून खटल्यात गुन्हा केवळ आरोपींनीच केला आहे, असे दर्शविणारी परिस्थितीजन्य पुराव्यांची नि:संदिग्ध व अखंड साखळी दिसत असेल तरच आरोपींना दोषी ठरविता येते. प्रस्तुत प्रकरणात तशी स्थिती नसल्याने संशयाचा फायदा देऊन सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे, असे खंडपीठाने नमूद केले. (विशेष प्रतिनिधी)न्यायालयाची अन्य निरीक्षणेअदिल रशिदच्या मृत्यूपूर्वी आरोपीच शेवटी त्याच्यासोबत होते, हा परिस्थितीजन्य पुरावाही नि:संशय नाही. कारण अदिल आरोपींसोबत घरातून बाहेर पडणे आणि त्याचा मृतदेह दुर्वेश गावात आढळणे या दरम्यान बराच काळ उलटून गेला होता. त्यामुळे दरम्यानच्या काळात अन्य कोणी अदिलचे बरेवाईट केले असण्याची शक्यता अगदीच अशक्यकोटीतील नाही.प्रवासासाठी ज्याच्याकडून अ‍ॅम्बॅसेडर मोटार भाड्याने घेतली होती त्या किशोर दधिच या ट्रॅव्हल एजन्टजवळ ‘आमच्याकडून एक खून झाला आहे,’ अशी आरोपींनी दिलेली कथित कबुली विश्वासार्ह नाही.पोलिसांनी गुन्हा नोंदवून शोधाशोध सुरू केल्यावर आरोपी मिस्त्री पिता-पुत्र मेरठला पळून गेले होते, हा प्रतिकूल परिस्थितीजन्य पुरावा मानून सत्र न्यायालयाने त्यांना दोषी ठरविले होते. परंतु ते चूक ठरविताना उच्च न्यायालयाने म्हटले की, प्रतिकूल परिस्थितीत स्वत:चा बचाव करणे ही स्वाभाविक मानवी प्रवृत्ती आहे. त्यामुळे अन्य काही सबळ पुरावा नसेल तर आरोपी पळून गेले होते एवढ्यावरून त्यांना दोषी धरता येणार नाही.