शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
5
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
6
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
7
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
8
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
9
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
10
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
11
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
12
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
13
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
14
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
15
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
16
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
17
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
18
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
19
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
20
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र

राज्यात दरदिवशी तीन लाचखोर जाळ्यात

By admin | Updated: October 12, 2016 06:23 IST

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यक्षम कारभारामुळे राज्यात दरदिवशी तीन लाचखोरांवर कारवाई होत आहे. जानेवारी ते आॅक्टोबर या ९ महिन्यात तब्बल ७८१ लाचखोरांना रंगेहाथ पकडले

आप्पासाहेब पाटील / सोलापूरलाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यक्षम कारभारामुळे राज्यात दरदिवशी तीन लाचखोरांवर कारवाई होत आहे. जानेवारी ते आॅक्टोबर या ९ महिन्यात तब्बल ७८१ लाचखोरांना रंगेहाथ पकडले. तर अपसंपदाच्या ११ तर अन्य भ्रष्टाचाराचे ११ इतर गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल केले आहेत़लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) वरिष्ठांनी राज्यातील एसीबीच्या सर्वच अधिकाऱ्यांना नागरिकांकडून आलेल्या प्रत्येक तक्रारीवर निर्णय घेणे सक्तीचे केले. एसीबीच्या कारवाईसाठी जनतेचा प्रतिसाद महत्त्वाचा आहे, हे ओळखून टोल फी क्रमांक, आॅनलाइन तक्रारी घेणे सुरू केले आहे (प्रतिनिधी)राज्यात चालू वर्षात आतापर्यंत ७८१ लाचखोर जाळ्यात सापडले. यात सर्वाधिक १४९ कारवाया पुणे विभागात झाल्या. त्या खालोखाल नाशिक ११५, नागपूर १११, औरंगाबाद १०४, नांदेड ८७, अमरावती ८८, ठाणे ९२ आणि मुंबईत ५७ लाचखोरांना पकडण्यात आले. महसूल व पोलीस विभाग टॉपवरराज्यात एसीबीने जानेवारी ते आॅक्टोबर या कालावधीत सापळा, अपसंपदा व अन्य भ्रष्टाचाराच्या कारवाईत तब्बल ७८१ जणांना पकडले़ यात सर्वाधिक लाचखोर म्हणजेच २२२ हे पोलीस विभाग तर २२० हे महसूल विभागातील आहेत़ याशिवाय पंचायत समिती ९९, म़रा़वि़मं़ ५६, महानगरपालिका ४९, शिक्षण विभागात ६३ कारवायांत लाचखोरांना पकडण्यात आले. १ कोटी ७४ लाखांची मालमत्ता जप्तसापळा कारवाईदरम्यान एसीबीच्या पथकाने राज्यातील ९९१ आरोपींकडून १ कोटी ७४ लाख १९ हजार २२३ रुपयांची मालमत्ता हस्तगत केली आहे़ याशिवाय पोलीस विभागाची २२ लाख ७० हजार ५४५, महसूल विभागाची १८ लाख ३५ हजार ९२८ एवढी मालमत्ता जप्त केली आहे़