लोकमत न्यूज नेटवर्ककर्जत (जि. अहमदनगर) : तालुक्यातील दुरगाव शिवार जंगलात सोमवारी दुपारी तीन मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले.जंगलात गुरे चारत असताना गुराख्याला तीन मृतदेह आढळले. पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. या ठिकाणी एक महिला (वय अंदाजे ३२ वर्षे) व एक लहान मुलगी (वय अंदाजे ८ वर्षे) तसेच एक लहान मुलगा (वय अंदाजे ६ वर्षे) असे तीन मृतदेह आढळले. त्यांना मारून त्यांचा चेहरा व शरीरावर अॅसिड टाकल्यामुळे मृतदेह अर्धवट जळालेल्या स्थितीत आहेत, असे पोलिसांनी सांगितले.
जंगलात आढळले अर्धवट जळालेले तीन मृतदेह
By admin | Updated: June 27, 2017 02:00 IST