शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

जेटीवर उभ्या असलेल्या तीन बोटी बुडाल्या

By admin | Updated: September 22, 2016 03:20 IST

तालुक्यात विक्रमी पावसाची नोंद झाली असून पुरिस्थतीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटला

डहाणू/बोर्डी : तालुक्यात विक्रमी पावसाची नोंद झाली असून पुरिस्थतीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटला तर घरांमध्ये पाणी शिरले. डहाणू प्रमुख राज्य मार्ग पाण्याखाली गेल्याने रस्त्ये वाहतूक पुर्णपणे ठप्प होऊन नागरिक अनेक ठिकाणी अडकले होते. झाई समुद्रकिनारी जेटीवर उभ्या तीन बोटी पुरात बुडल्या असून, अन्य बोटींचे नुकसान झाले आहे. दरम्यान आपत्कालीन परिस्थितीत शासकीय यंत्रणा कुचकामी ठरल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. महाराष्ट्र गुजरात सीमेवरील झाई समुद्रकिनारी जेटीवर सुमारे अडीचशे बोटी उभ्या होत्या. पुराच्या पाण्यामुळे त्या पैकी इंद्रउचद अण्णा माच्छी या बोटमालकांची साईरामप्रसाद, सुनीता चंद्रकांत माच्छी यांची जलाराम व झाई पुलनाजीक मांगेला मच्छीमार सोसायटीची एक बोट अश्या तीन बोटी बुडल्या असून बोटीतील साहित्य वाहून गेले. तर अन्य तीन बोटींचे नुकसान झाल्याने मासेमारी हंगामाला मुकणार असून मिच्छमारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. डहाणू तालुक्यात २० व २१ सप्टेंबर या काळात एकूण ५२८.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे पुरिस्थती येऊन, अनेक गावातील घरांमध्ये पाणी शिरले, रस्ते पाण्याखाली गेल्याने संपर्क तुटला. सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास अचानक पुराच्या पाण्याची पातळी वाढल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सकाळची वेळ असल्याने जिवीतहानी टळली. शिवाय ग्रामस्थांच्या मदतीने घरातील विविध वस्तु सुरक्षित जागी ठेवता आल्याने मोठे आर्थिक नुकसान टळले. चिखले सरपंच अनिता कवटे यांच्या घरी, चिखले पोलीस चौकी आणि अन्य ग्रामस्थांच्या घरांमध्ये पाणी शिरले होते.डहाणू बोर्डी प्रमुख राज्य मार्गावर झाई, बोर्डी, घोलवड, चिखले, नरपड या ठिकाणी पुराच्या पाण्यामुळे रस्त्ये वाहतूक ठप्प झाली. नोकरी-धंद्यानिमित्त पहाटे घरातून बाहेर पडलेले चाकरमानी ठिकठिकाणी अडकून पडले. सकाळी नऊ वाजेनंतर पावसाने उघडीप दिली. दुपारी दोन नंतर पाण्याची पातळी घटल्यानंतर स्थानिकांच्या मदतीने वाहनांना मार्गस्थ करण्यात आले. दरवर्षी पावसाळ्यात तालुक्याला किमान दोन ते तीन वेळा पुराचा फटका बसून जनजीवन विस्कळीत होते.>डिजिटल इंडियाचा दावा फोल नागरिकांना जीवावर उदार होऊन स्व संरक्षण करावे लागले. डिजटल इंडियाचा दावा फोल ठरला असून आपत्कालीन परिस्थितीचा संदेश शासकीय यंत्रणेकडून गावपातळीपर्यंत पोहचलाच नाही. पावसामुळे सट्टी घ्यावी लागल्यामुळे नोकरदार वर्गामध्ये समिश्र प्रतिक्रि या व्यक्त होत होती. सोशल मीडियावर दिवसभर पावसाचे फोटो फिरत होते. त्यामुळे परिसरातील पुरिस्थतीची माहिती नागरिकांना मिळत होती.>भाताची उभी पिके आडवीआदिवासी पाडयावर अनेक घरात भातांची कणगी आणि गृहोपयोगी वस्तु भिजल्याने संसार रस्त्यावर आला आहे. किरण गजानन पाटील यांच्या शेतावरील सुमारे पंचवीस हजार किमतीचे ठिबकिसंचन साहित्य पुरात वाहून गेले असून विविध गावांमध्ये शेतातील उभी भात पिकं आडवी झाली.