शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

वायुबाधाप्रकरणी तिघांना अटक

By admin | Updated: December 8, 2014 02:51 IST

वालधुनी नदीत टँकरमधून विषारी रसायने सोडल्याने नदी परिसरात राहणा-या नागरिकांना वायुबाधा झाली होती. या प्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी शनिवारी दोघांना तर रविवारी आणखी तिघांना अटक केली.

अंबरनाथ : वालधुनी नदीत टँकरमधून विषारी रसायने सोडल्याने नदी परिसरात राहणा-या नागरिकांना वायुबाधा झाली होती. या प्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी शनिवारी दोघांना तर रविवारी आणखी तिघांना अटक केली. वालधुनी नदीत रासायने सोडण्यात येत असल्यामुळे २९ नोव्हेंबरला ३८७ नागरिकांना वायुबाधा झाली होती. या प्रकरानंतर अंबरनाथ पोलीस ठाण्यात अज्ञात टँकरचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी शनिवारी टँकर चालक दीपक जैसवाल आणि टँकरमालक रमेश गुडरू यांना अटक केली. ही कारवाई झाल्यावर दुसऱ्याच दिवशी टँकरमालक राहुल शेठ आणि चालक रवींद्र रमेश पवार, आनंदराव गोरख पवार यांनाही अटक करण्यात आली. त्यांच्याकडील एमएच०६ बीडी २०२७ आणि एमएच ०६ बीडी १६६ हे दोन टँकरही ताब्यात घेतले आहे. हे तिघेही महाडचे रहिवासी आहेत. ज्या केमिकल कंपनीतून ही रसायने आणण्यात आली होती त्या कंपनीच्या मालकांना अद्याप अटक झालेली नाही. तसेच नदीत सोडलेले घातक रसायन कोणते होते याचीही माहिती मिळालेली नाही.दुसरीकडे २९ नोव्हेंबरला वालधुनी नदीत वायुबाधा झाल्यानंतर लगेचच ३ डिसेंबरला अंबरनाथच्याच गोविंद पुल परिसरातही रासायनिक कचरा टाकल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती. या प्रकरणात शिवाजीनगर पोलिसांनी वडोल गावातील बंटी तुकामार म्हात्रे याला अटक केली आहे. न्यायालयात हजर केले असता बंटीला जामिनावर सोडण्यात आले आले. वालधुनी नदीला प्रदुषणामुळे नाल्याचे रूप आले आहे. याचा आरोग्यावर परिणाम होत आहे. (प्रतिनिधी)