शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारकडून लोकशाहीला धोका!

By admin | Updated: February 14, 2015 04:00 IST

केंद्र सरकारच्या भूसंपादन कायद्याविरुद्ध एल्गार पुकारणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा टिकेची तोफ डागत

अहमदनगर : केंद्र सरकारच्या भूसंपादन कायद्याविरुद्ध एल्गार पुकारणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा टिकेची तोफ डागत कायद्यात बदल करुन धोका देणाऱ्या केंद्र सरकारकडून लोकशाहीलाही धोका संभवतो, असा हल्लाबोल केला आहे. अण्णांनी त्यांच्या ताज्या ब्लॉगमध्ये दिल्ली आंदोलनाची रुपरेषा जाहीर केली आहे. नवा कायदा म्हणजे उद्योजकांच्या घशात जमीन घालण्याचा डाव असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. आधीच्या कायद्यात गावातील जमीन संपादीत करण्यासाठी ७० शेतकऱ्यांची मंजुरी आवश्यक होती. सिंचनाखालील जमीन संपादीत न करण्याची अट होती. संपादीत जमीन ५ वर्षांत विकसित न केल्यास ती परत करता येणार होती. मात्र ९ महिन्यांपूर्वी सत्तेत आलेल्या मोदी सरकारने २०१३ च्या भूसंपादन कायद्यात अनेक बदल करत शेतकरीविरोधी निर्णय घेतले. हा देशाशी धोका असून ग्रामसभेच्या अधिकारांवर गदा आणण्याचा प्रकार आहे. २३ व २४ फेब्रुवारी दिल्लीत जंतर-मंतरवरील आंदोलनात देशातील ७० ते ८० सामाजिक-शेतकरी संघटना सहभागी होणार आहेत. २० फेब्रुवारीला पलवल (हरियाणा) येथून डॉ. पी. व्ही. राजगोपाल यांच्या नेतृत्वातील पदयात्रेला हिरवा झेंडा दाखवून आंदोलनाला प्रातिनिधिक प्रारंभ होईल. २३ फेब्रुवारीला दिल्लीत जंतर-मंतरवर पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्रासह अन्य राज्यांतून १५ ते २० हजार शेतकरी एक दिवसाचे धरणे आंदोलन करतील. दुसऱ्या दिवशी २४ रोजी डॉ. राजगोपाल यांच्या नेतृत्वातील पदयात्रा जंतर-मंतरवर पोहचणार आहे. सोबत मेधा पाटकर, गोविंदाचार्य, डॉ. सुब्बाराव, राजेंद्रसिंह यांच्यासह देशभरातून आलेले ७० ते ८० संघटनांचे प्रतिनिधी आंदोलनात सहभागी होतील. हे आंदोलन लाक्षणिक असेल. त्यातून केंद्र सरकारला इशारा दिला जाईल, असे अण्णांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे. लाक्षणिक आंदोलनानंतर सरकारला जाग आली नाही तर रामलिला मैदानावर बेमुदत आंदोलन उभारण्यात येणार असल्याचे अण्णांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)