शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

रामशेज किल्ल्यावर दुर्ग पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला : -शिवजयंती साजरी करण्यासाठी हजारो पर्यटक

By admin | Updated: February 19, 2017 13:32 IST

छत्रपती शिवाजी महाराज यांची साजरी करण्यासाठी नाशिक शहर व परिसरातून हजारो दुर्ग पर्यटक, स्वयंसेस्वी संस्था

नाशिक - छत्रपती शिवाजी महाराज यांची साजरी करण्यासाठी नाशिक शहर व परिसरातून हजारो दुर्ग पर्यटक, स्वयंसेस्वी संस्था व नागरिकांनी दिंडोरी तालुक्यातील रामशेज किल्ल्यावर पहाटेपासून मोठया प्रमाणावर गर्दी केली होती. मात्र अचानकपणे मधमाशांनी हल्ला केल्याने सर्वत्र एकच धावपळ व पळापळ झाली.शिवजयंतीचे औचित्य साधून नाशिक शहरातील नामवंत डॉक्टर्स, सायकलिंग ग्रूप, ग्लोबल ग्रूप, सोशल नेटवर्किंग फोरम , वैद्यकिय महाविद्यालय विद्यार्थी मंच, नाशिक मेडिकोज यांचेसह शहरातील नागरिकांनी रामशेज किल्ल्यावर शिवजयंती उत्सव साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार सकाळी सात वाजेपासून पर्यटकांची गडाकडे आगेकूच सुरू झाली. यामध्ये पुरुष , स्त्रियासह लहान बालकांचा व विद्यार्थाचा मोठया प्रमाणावर सहभाग होता. किल्लावरील शिवध्वज स्तंभाजवळ शिवरायांच्या पुतळ्याच्या पूजनाची तयारी सुरू असतांना अचानक कडेकपारी करून मधमाशांचा ओघ सुरु झाला. प्रारंभी विरळ असलेल्या माशा वाढत गेल्या. गडावरील पर्यटकांच्या अंगाला माशा झोंबू लागल्याने एकच पळापळ सुरू झाली. जो तो आपला जीव वाचवत गडावरून पायथ्याकडे पळू लागले. मात्र माशा काही पाठ सोडत नव्हत्या. दिसेल तेथे आसरा घेत माशापासून बचाव करत अवघ्या 15 मिनिटात संपूर्ण गड खाली झाला. अनेकांचे साहित्य, मोबाईल, बॅगा या गडबडीत पडून गेल्या. तर उतरत असतांना पाय घसरून पडल्याने काहींना किरकोळ जखमाही झाल्या. उपस्थित डॉक्टरांनी तात्काळ आपआपल्या हॉस्पीटला फोन करून रुग्णवाहिका मागवल्या तर काहींनी 10 8 ला कॉल केल्याने दहा मिनिटात रामशेजच्या पायथ्याशी सात - आठ रुग्णवाहिका दाखल झाल्या. माशांनी चावा घेतलेल्या रुग्णांवर जागेवर उपचार करण्यात आले. तर काहींना प्राथमिक उपचार करून रुग्णालयात हलवण्यात आले.