शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

‘हायजॅक’ची धमकी देणाऱ्यास अटक

By admin | Updated: November 29, 2015 01:21 IST

एअर इंडियाचे विमान २८ नोव्हेंबर रोजी ‘हायजॅक’ करण्याची धमकी देणाऱ्या मध्य प्रदेश, रहटगावमधील महेश विष्णुप्रसाद मीणा (२०) याला ठाणे शहर पोलिसांनी २७ नोव्हेंबर रोजी अटक

ठाणे : एअर इंडियाचे विमान २८ नोव्हेंबर रोजी ‘हायजॅक’ करण्याची धमकी देणाऱ्या मध्य प्रदेश, रहटगावमधील महेश विष्णुप्रसाद मीणा (२०) याला ठाणे शहर पोलिसांनी २७ नोव्हेंबर रोजी अटक केली. त्याने हा कॉल मिळालेल्या सीमकार्डवरून केल्याचे समोर आले आहे. सध्यातरी तो बोगस कॉल आहे, असे म्हणता येणार नाही. तसेच त्याने आपण इसिस या अतिरेकी संघटनेचा सदस्य असल्याची बतावणी केल्याप्रकरणी मुंबई दहशतवादविरोधी पथक आणि गुप्तचार खाते त्याची चौकशी करीत असल्याची माहिती पत्रकार परिषदेत पोलिसांनी दिली.‘मैं इसिस का आतंकवादी बात कर रहा हूँ, हम २८ नव्हंबर को एअर इंडिया का प्लेन हायजॅक करनेवाले है, अशी धमकी वागळे इस्टेट रोड नंबर २२ येथील एअर इंडियाच्या कॉल सेंटरला २० नोव्हेंबर रोजी फोन करून दिली. याप्रकरणी संबंधित कॉल सेंटर व्यवस्थापनाने श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे पोलिसांसह दहशतवादविरोधी पथकानेही तपास सुरू केला. याचदरम्यान, तो कॉल मध्य प्रदेशातून आल्याचे तपासात उघडकीस आल्यावर श्रीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस.जी. तुंगेनवार, हवालदार भगवान मोरे आणि विकास लाहोर असे पोलीस पथक मध्य प्रदेशला रवाना झाले.याचदरम्यान, या पथकाने स्थानिक चिंचाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार कुमरे आणि रहटगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रघुवंशी यांच्या मदतीने मीणा याला अटक केली. त्याला घेऊन ठाणे पोलीस २७ नोव्हेंबर रोजी ठाण्यात आल्यावर चौकशी करून अटक केली. ठाणे न्यायालयाने त्याला २ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी भादंवि कलम ५०६ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मध्य प्रदेशातील रहटगावातून महेश वाणीला अटक१) महेश मीणा हा १२ वी आर्टस्चा विद्यार्थी आहे. तो मध्य प्रदेशातील रहटगाव येथे आई, वडील, भाऊ आणि बहिणीसह राहतो. त्याचे पहिलीपासूनचे शिक्षण तेथील पूर्वप्राथमिक आणि माध्यमिक शाळेत झाले, तसेच त्याचे वडील शेतकरी असून, त्यांची सव्वा एकर शेती आहे, तर त्याचा भाऊ नोकरी करतो.२) रहटगाव हे मध्य प्रदेशमधील हर्धाच्या सीमेवर आहे. येथील लोकसंख्या साधारणत: १० ते १५ हजार असून, २५ टक्के लोकवस्ती ही मुस्लीम आहे. ३) महेशकडे मिळालेल्या तीन सिमकार्डमध्ये एक सिमकार्ड त्याच्या तर दुसरे त्याच्या भावाच्या नावे आहे. तिसरे सीम हे त्याला मिळाले आहे, असे प्राथमिक तपासात समोर आले. ते सीम चोरीचे किंवा गहाळ झालेल्या मोबाइलमधील असावे, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.४) ज्या सीम नंबरवरून फोन आला होता, ते महेशचे नसून, ते सिम मध्य प्रदेशातील अन्य एकाचे आहे. त्यातील बॅलन्स ५२ रुपये असल्याने, मूळ सिमधारकाने त्याकडे दुर्लक्ष केले आणि या प्रकरणी कोणतीच तक्रार त्याने केली नसल्याचे, सध्या तरी समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली.विमान हायजॅक करण्याची धमकी देणाऱ्यास अटक के ली असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. मात्र, तो कॉल बोगस आहे का? त्याचबरोबर त्याची पार्श्वभूमी आणि त्याचा अतिरेकी संघटनेशी काही संबंध आहे का?, याबाबत श्रीनगर पोलीस, मुंबई दहशतवादी पथक आणि गुप्तचर खात्यामार्फत चौकश्ी सुरू असल्याचे, वागळे इस्टेट परिमंडळ-५ चे पोलीस उपायुक्त व्ही.बी. चंदनशिवे यांनी सांगितले.