शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ पर्यवेक्षिकांना ‘देयक स्वाक्षरी’चे अधिकार!

By admin | Updated: August 2, 2016 05:21 IST

बाल विकास प्रकल्प अधिकारी गट ब च्या रिक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणाऱ्या या प्रकल्पाच्या वरिष्ठ पर्यवेक्षिकांना देयकावरील ‘स्वाक्षरी’चे अधिकार प्रदान करण्यात आले

संतोष वानखडे,

वाशिम- राज्यातील बाल विकास प्रकल्प अधिकारी गट ब च्या रिक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणाऱ्या या प्रकल्पाच्या वरिष्ठ पर्यवेक्षिकांना देयकावरील ‘स्वाक्षरी’चे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. यामुळे आता कोषागारात कोणतेही देयक अडणार नाही. यासंदर्भात शासनाने २८ जुलैला जारी केलेला आदेश आता जिल्हा स्तरावर पोहोचला आहे.ग्रामविकास विभागाकडील बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांची (गट ब) ४४९ पदे ही महिला व बालविकास विभागाकडे कायमस्वरूपी वर्ग करण्यात आली आहेत. या पदांच्या तुलनेत केवळ ९६ अधिकाऱ्यांच्या सेवा ग्राम विकास विभागाकडून महिला व बाल विकास विभागाकडे वर्ग करण्यात आल्याने रिक्त पदांची संख्या झपाट्याने वाढली. राज्यातील अनेक ठिकाणी बाल विकास प्रकल्प अधिकारी (गट ब) या पदाचा अतिरिक्त कार्यभार त्या तालुक्याचे गटविकास अधिकारी, काही ठिकाणी प्रकल्पाच्या वरिष्ठ पर्यवेक्षिका यांच्याकडे सोपविण्यात आलेला आहे. मात्र, पर्यवेक्षिका हे पद वर्ग तीनचे असून, ते राजपत्रित अधिकारी नसल्याने देयकांवरील स्वाक्षरीचा मुद्दा ऐरणीवर आला होता. पर्यवेक्षिकांच्या स्वाक्षरीने पारित केलेली बाल विकास प्रकल्प कार्यालयातील देयके कोषागारातून पारित होत नसल्याने देयके थांबली होती.बालविकास प्रकल्प अधिकारी पद रिक्त असणाऱ्या कार्यक्षेत्रातील पाच वर्षे सेवा झालेल्या पर्यवेक्षिकेकडे सदर रिक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला असेल, अशा ठिकाणच्या पर्यवेक्षिकेला आहरण व संवितरण अधिकारी पदाचा दर्जा देण्यात आला. दरम्यान, पश्चिम वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यात बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या अनेक जागा रिक्त आहेत.