शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ बेकायदा गाळ्यांवर हातोडा

By admin | Updated: October 8, 2016 03:16 IST

कल्याण-बदलापूर राज्य महामार्गाचे काम करताना आड येणारी सर्व बेकायदा बांधकामे तोडली होती.

अंबरनाथ : कल्याण-बदलापूर राज्य महामार्गाचे काम करताना आड येणारी सर्व बेकायदा बांधकामे तोडली होती. त्यातील काही व्यापाऱ्यांनी संगनमत करून महात्मा गांधी विद्यालयाला दिलेल्या जागेवर बेकायदा गाळे उभारले. या प्रकरणी तक्रारी केल्यावर या गाळेधारकांनी आघाडी सरकारमधील तत्कालीन महसूलमंत्र्यांकडून स्थगिती आदेश मिळवला होता. मात्र, उच्च न्यायालयाने या प्रकरणी सुनावणी घेण्याचे आदेश दिल्यावर महसूलमंत्र्यांनी या प्रकरणी सुनावणी घेत आधीचा स्थगिती आदेश रद्द केला. त्यामुळे आता या सर्व बेकायदा गाळ्यांवर कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे. कल्याण-बदलापूर महामार्गाला लागूनच महात्मा गांधी विद्यालय आणि या शाळेला शैक्षणिक उपक्रमासाठी जागा दिली आहे. या जागेवर शाळेकडून कोणताच वापर होत नसल्याने ती पडीक आहे. तीन वर्षांपूर्वी राज्य महामार्गाचे काम सुरू असताना याच जागेला लागून असलेल्या बेकायदा व्यापारी गाळ्यांवर कारवाई निश्चित मानली जात होती. त्यामुळे येथील व्यापाऱ्यांनी कारवाई होण्याआधीच दुकाने तोडली. मात्र, त्यानंतर लागलीच याच दुकानांच्या मागील बाजूला असलेल्या महात्मा गांधी विद्यालयाच्या जागेवर बेकायदा गाळे उभारले. या कामाला महात्मा गांधी विद्यालयाच्या तत्कालीन संस्थाचालकांचा अप्रत्यक्ष पाठिंबा होता. त्यात आर्थिक व्यवहारही झाला होता. या प्रकरणी शाळा कोणतीच भूमिका घेत नसल्याने शौकत शेख यांनी बेकायदा गाळ्यांप्रकरणी तक्रार दाखल केली. मात्र, या व्यापाऱ्यांनी आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन महसूलमंत्र्यांकडे दाद मागत या कारवाईला स्थगिती आदेश आणला. मंत्र्यांनी स्थगिती दिल्याने शेख यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. या जनहित याचिकेवर सुनावणी देताना न्यायालयाने तीन महिन्यांत शेख यांची तक्रार निकाली काढण्याचे आदेश दिले होते. (प्रतिनिधी)महसूलमंत्र्यांकडून आदेश रद्दमहसूलमंत्र्यांनी या प्रकरणी व्यापारी, तक्रारदार आणि तहसीलदारांना बाजू मांडण्यास सांगितले. या सर्वांचे अवलोकन केल्यावर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आधीचा स्थगिती आदेश रद्द केला आहे. त्यामुळे आता या बेकायदा गाळ्यांवर कारवाई करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.