शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

त्या ६३० कर्मचाऱ्यांच्या जबानीला सुरुवात

By admin | Updated: October 8, 2016 04:26 IST

मीरा रोड येथील सात कॉल सेंटरवरील छाप्याप्रकरणी ताब्यात घेतल्यानंतर तत्काळ नोटिसा बजावलेल्या ‘त्या’ ६३० पैकी ४०० जणांच्या जबानीला शुक्रवारपासून सुरुवात झाली.

ठाणे : मीरा रोड येथील सात कॉल सेंटरवरील छाप्याप्रकरणी ताब्यात घेतल्यानंतर तत्काळ नोटिसा बजावलेल्या ‘त्या’ ६३० पैकी ४०० जणांच्या जबानीला शुक्रवारपासून सुरुवात झाली. ती ठाणे शहर पोलिसांच्या वेगवेगळ्या आठ गुन्हे शाखांमार्फत सुरू केल्याने ‘त्या’आठ शाखांवर एकच झुंबड पडल्याचे पाहण्यास मिळाले. अटक केलेल्या ७० जणांना एकाच ठिकाणी ठेवता येईल, इतकी जागा ठाणे पोलिसांकडे नसल्याने ही कारवाई करणाऱ्या त्यात्या पथकाच्या कोठडीत त्यांना ठेवले आहे. अमेरिकन नागरिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक करणाऱ्या मीरा रोड, नयानगर या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत बनावट कॉल सेंटरवर ठाणे गुन्हे शाखेने कारवाई केली. या वेळी पोलिसांनी जवळपास ७४३ जणांना ताब्यात घेतले होते. त्यातील ७० जणांना अटक केली, तर त्या वेळी ६३० जणांना नोटिसा बजावल्या होत्या. ठाणे न्यायालयाने त्या ७० जणांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (प्रतिनिधी) >५० टक्के कॉल सेंटर बंदमीरा रोड येथील बेकायदेशीररीत्या चालणाऱ्या त्या कॉल सेंटरवर कारवाई होताच मुंबई, नवी मुंबईतील अशा प्रकारे चालणारे जवळपास ५० टक्के बेकायदेशीर कॉल सेंटर बंद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच मीरारोड येथे या कॉल सेंटरची मुख्य लिंक असल्याचे बोलले जाते.आठ शाखांद्वारे जबानी सुरू कॉल सेंटरप्रकरणी ठाणे गुन्हे शाखेच्या ठाणे शहर, वागळे इस्टेट, कल्याण, उल्हासनगर, भिवंडी, खंडणी, अनैतिक मानवी प्रतिबंधक विभाग आणि सोनसाखळी पथक या गुन्हे शाखांमार्फत जबानी घेतली जात आहे फसवणूक झालेल्यांचे मेसेज सुरू फसवणूक झालेल्या अमेरिकेतील भारतीय तसेच अमेरिकन नागरिकांचे मेसेज ठाणे पोलीस दलात ओळखीच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या मोबाइलवर धडकत आहेत. ते त्या पोलीस अधिकाऱ्यांच्या नातेवाइकांमधील मित्र मंडळींचे असल्याचे सूत्रांनी सांगितले.