शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

थोरल़्या विवाहीत बहिनीला पळवले, धाकटीला धमकी देऊन तीन वेळा बलात्कार

By admin | Updated: August 21, 2016 14:30 IST

थोरल्या विवाहीत बहिनीला धाक दाखवून पळवून नेल्यानंतर तिच्या १५ वर्षाच्या अल्पवयीन बहिनीवर धमकी देऊन तीन वेळा बलात्कार केल्याची फिर्याद देण्यात आली आहे

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. २१ : मुढाळे (ता. बारामती) येथे थोरल्या विवाहीत बहिनीला धाक दाखवून पळवून नेल्यानंतर तिच्या १५ वर्षाच्या अल्पवयीन बहिनीवर धमकी देऊन तीन वेळा बलात्कार केल्याची फिर्याद देण्यात आली आहे. आरोपी काळे फरारी झाला आहे. त्याच्या शोधार्थ पोलिस पथक पाठवण्यात आले आहे. आरोपी आणि फिर्यादी भटक्या समाजातील आहे. आर्थिक व्यवहारातून हा प्रकार घडला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

याप्रकरणी दिलीप मदन काळे (रा. बडेखान, ता. फलटण, जि. सातारा) याच्या विरोधात वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीवर मे २०१६ ते १४ आॅगस्ट २०१६ या कालावधीत तीन वेळा अत्याचार करण्यात आला. आरोपीच्या विरोधात बलात्कारासह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पिडीत मुलीच्या आईने वडगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी महिलेची विवाहीत मुलगी मंगळवारी (दि. १६) दुपारी ३ वाजता घरातून निघून गेली. तिचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही.

याबाबत मुलीच्या आईने विवाहीत मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार वडगाव पोलिस ठाण्यात दिली. त्यानंतर विवाहीत मुलीला आरोपी दिलीप काळे यानेच पळवून नेल्याची माहिती पिडीत कुटूंबाला मिळाली. या दरम्यान त्यांनी अधिक चौकशी केली असता, त्यांच्या १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर आरोपी काळे याने मे २०१६ ते १४ आॅगस्ट २०१६ दरम्यान धमकी देऊन तीन वेळा बलात्कार केला. यानंतर पीडित मुलीच्या आईने वडगाव पोलिस ठाण्यात काळे याच्या विरोधात फिर्याद दाखल केली. पिडीत अल्पवयीन मुलगी आठवीमध्ये शिकत आहे.

मे महिन्यात काळे हा मुढाळे येथे पिडीत मुलीच्या घरी आला होता. घरी कोणी नसल्याचे पाहून पिडीत मुलीला विवाहाचे अमिष दाखवत आपण पळून जाऊन लग्न करू, असे अश्वासन दिले. पळून गेलो तर घरचे आपल्याला जिवंत सोडणार नाहीत, असे पिडीत मुलीने काळे याला सांगितले.

त्यावर आरोपीने, तुझ्या भावाला व बहिनीला खोट्या गुन्ह्यात अडकवेन, त्यांना जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर जुनमध्ये देखील काळे याने पिडीत मुलीवर बलात्कार केला. रविवारी (दि. १४) पिडीत मुलीला शाळेला सुट्टी असल्याने ती घरीच होती. घरातील लोक बाहेर गेले असताना त्याने पुन्हा घरी येऊन अल्पवयीन मुलीवर तिसऱ्यांदा बलात्कार केल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. काळे याच्या विरूद्ध बलात्कारासह बाललैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास वडगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक सचिन पाटील करीत आहेत. आर्थिक व्यवहारातून प्रकार घडल्याचा पोलिसांचा संशयया संदर्भात वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक सचिन पाटील यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, थोरली विवाहीत मुलगी बेपत्ता असल्याची फिर्याद यापूर्वी दाखल आहे. आरोपी दिलीप काळे यानेच तीला पळवून नेले आहे. असा संशय तिच्या आईने व्यक्त केला. त्यानंतर धाकट्या अल्पवयीन मुलीवर आरोपी काळे यानेच तीन वेळा जबरदस्तीने बलात्कार केल्याची फिर्याद दिली. आरोपी व फिर्यादी भटक्या समाजातील आहेत. त्यांच्यातील लग्नाच्या परंपरागत पद्धतीच्या अर्थिक व्यवहारातून हा प्रकार घडला असावा. आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पोलिस पथक रवाना केले आहे. दरम्यान थोरली बेपत्ता विवाहीत मुलगी तिच्या नवऱ्याच्या घरी आढळून आली आहे, असा दावा पाटील यांनी केला.