शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
2
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
3
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
4
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
5
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
6
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
7
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
8
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
9
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
10
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
11
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
12
Viral: रीलचा नाद जीवावर बेतला; २२ वर्षीय युट्यूबर धबधब्यामध्ये बुडाला, घटनाकॅमेऱ्यात कैद
13
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
14
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
15
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
16
चौथ्या स्टेजच्या कर्करोगाशी झुंजतेय अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी, तिला सतावतेय ९ वर्षांच्या मुलीची चिंता
17
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
18
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
19
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
20
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण

सायन कोळीवाड्यात कांटे की टक्कर

By admin | Updated: January 20, 2017 02:18 IST

फेररचनेमुळे ८० टक्के प्रभागांचे तुकडे होऊन नवीन प्रभागाने आकार घेतला आहे.

मुंबई : फेररचनेमुळे ८० टक्के प्रभागांचे तुकडे होऊन नवीन प्रभागाने आकार घेतला आहे. यामुळे मतदारही विखुरले गेल्याने राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे प्रस्थापितांना अस्तित्वासाठी, तर गेल्या निवडणुकीत बाहेर फेकले गेलेल्यांना ती पत परत मिळवण्यासाठी लढा द्यावा लागणार आहे. भाजपाचा गड मानला जाणाऱ्या सायन-कोळीवाडा विधानसभा क्षेत्रातही विजयी दौड सुरूच राहण्यासाठी भाजपाने त्यांची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तर काँग्रेसने सर्व शक्ती पणाला लावून कडवे आव्हान उभे करण्याची रणनीती आखली आहे.प्रभाग क्रमांक १६५ व १६७मधील काही भाग वेगळे करून प्रभाग क्रमांक १७२ तयार झाला आहे. चुन्नाभट्टी ते माटुंगा रेल्वे स्थानक अशा या प्रभागात जुन्या इमारतींचा पुनर्विकास व वाहतुकीची कोंडी हे प्रमुख मुद्दे आहेत. फेररचनेत नव्याने आकाराला आलेला हा प्रभाग आरक्षणात सर्वसामान्य वर्गासाठी खुला झाला आहे. त्यामुळे सर्वच इच्छुकांची उडी या प्रभागावर पडू लागली आहे. मात्र, गुजराती जनसंख्या अधिक असल्याने भाजपा आणि भाजपापूर्वी अनेक वर्षे या ठिकाणी काँग्रेस असल्याने दोन्ही पक्ष तगड्या उमेदवाराच्या शोधात आहेत.प्रभाग क्रमांक १६५चा काही भाग तर १६७ प्रभागाचा सर्वाधिक भाग प्रभाग क्रमांक १७२मध्ये आहे. १६५मध्ये शिवसेनेच्या प्रणिती वाघधरे, तर १६७मध्ये भाजपाच्या राजश्री शिरवाडकर विद्यमान नगरसेवक आहेत. (प्रतिनिधी)>काँग्रेसला संधीकाँग्रेसचे उपेंद्र दोशी तीन टर्म, तर त्यांच्या पत्नी रेखा दोशी एक टर्म या प्रभागातून निवडून आल्या आहेत. गेल्या निवडणुकीत हा प्रभाग मागासवर्गीय महिलांसाठी आरक्षित झाल्याने दोशी कुटुंब बाद झाले; परंतु यावेळी हा प्रभाग खुला झाल्याने दोशी प्रयत्नशील आहेत. तर काँग्रेसमध्ये दावेदार वाढल्याने रस्सीखेचही सुरू आहे.>भाजपात दावेदार वाढलेविधानसभा निवडणुकीत भाजपाचे तमील सेलवन निवडून आले. त्यांनी काँग्रेसचे जगन्नाथ शेट्टी आणि शिवसेनेचे मंगेश साटमकर यांचा पराभव केला होता. राष्ट्रवादीचे प्रसाद लाड भाजपात आले आहेत. तर विद्यमान नगरसेविका राजश्री यांचे पती राजेश शिरवाडकर या ठिकाणी इच्छुक असल्याचे समजते. शिवसेनेतून शाखाप्रमुख अशोक वाघमारे यांचे नाव चर्चेत आहे. >गुजराती मतदारांचा कौल निर्णायक या प्रभागात ३८ हजार मतदार असून, गुजराती जनसंख्या अधिक आहे. त्यामुळे सर्वच पक्ष या ठिकाणी गुजराती उमेदवार उभा करण्याची शक्यता आहे. मात्र, येथील गुजराती मतदार कोणाला कौल देणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.