शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

तीस मित्रांनी घेतला विसर्जनाचा वसा

By admin | Updated: September 10, 2016 01:56 IST

विसर्जनानंतर गणपती बाप्पाच्या भग्न मूर्ती दुसऱ्याच दिवशी किनाऱ्यावर विदारक स्थितीत पाहावयास मिळतात.

हितेन नाईक

पालघर- विसर्जनानंतर गणपती बाप्पाच्या भग्न मूर्ती दुसऱ्याच दिवशी किनाऱ्यावर विदारक स्थितीत पाहावयास मिळतात. कित्येक जण त्यावर टीका करतात; आणि सरतेशेवटी कुणावर तरी खापर फोडले जाते. मात्र, शिरगावच्या श्रीगणेश मित्र मंडळातील (युवा मांगेलआळी) ३० मित्रांनी एकत्र येऊन विसर्जनासाठी आलेल्या भाविकांना होडी व इतर सेवा विनामूल्य देण्याचा पण केला आहे.गणपती बाप्पा भक्तांच्या घराघरांत स्थानापन्न होण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, पालघर जिल्ह्यात ३४ हजार ९८९ मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे. समुद्रात विसर्जनानंतर ओहोटीच्या वेळी अवशेष किनाऱ्यावर अस्ताव्यस्त पडल्याचे वेदनादायक चित्र प्रत्येक वर्षी पाहावयास मिळत होते. बाप्पाची होणारी ही विटंबना रोखण्यासाठी शिरगावच्या श्रीगणेश मित्र मंडळाच्या रितेश निजप, अमोल तांडेल, सुजीत पागधरे, अक्षय किणी, राहुल किणी, चेतन धनू आदी ३० मित्रांनी १०-१० मुलांच्या तीन वेगवेगळया टीम बनवून आपल्याजवळील होड्यांद्वारे खोल समुद्रात गणेशमूर्तींचे विसर्जन केले. >विटंबना टाळण्यासाठीअनंत चतुर्दशीपर्यंत आपण ही सेवा विनामूल्य देणार असल्याचे अध्यक्ष रितेश निजप यांनी सांगितले. त्यांनी केलेल्या आवाहनानंतर पालघर, धनसार, अल्याळी, टेंभोडे आदी भागांतील अनेक भक्तांनी आपल्या मूर्तींची विटंबना टाळण्यासाठी शिरगावचा समुद्रकिनारा गाठला. या वेळी कुठलीही दुर्घटना होऊ नये म्हणून काही तरु ण लाइफ जॅकेटच्या साहाय्याने समुद्रात शिरणाऱ्या भक्तांवर नजर ठेवून होते.