शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
4
नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
5
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
6
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
7
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
8
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
9
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
10
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
11
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
12
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
13
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
14
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
15
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
16
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
17
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
18
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
19
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
20
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
Daily Top 2Weekly Top 5

तेरावी प्रवेश ८ जूनपासून..?

By admin | Updated: June 5, 2016 00:42 IST

तेरावी प्रवेश प्रक्रियेला मुहूर्त मिळाला असून ८ जूनपासून तेरावी प्रवेश सुरु होईल, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आल्याने अ‍ॅडमिशनची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

मुंबई : तेरावी प्रवेश प्रक्रियेला मुहूर्त मिळाला असून ८ जूनपासून तेरावी प्रवेश सुरु होईल, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आल्याने अ‍ॅडमिशनची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.बारावीचा निकाल लागल्यानंतर अगदी काहीच दिवसात तेरावीसाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू होते. पण यंदा दहा दिवस उलटूनही अ‍ॅडमिशन सुरु होण्याची चिन्ह दिसत नव्हती. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. यंदा तेरावी प्रवेश आॅनलाईन रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य करण्यात आले आहे. विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया राबवण्यासाठी सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या‘एमकेसीएल’ कंपनीबाबत अनेक तक्रारी संघटनांकडून आल्या होत्या. मात्र आता नव्या प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यापीठाकडे कंपन्यानी चार नव्या निविदा सादर केल्या आहेत. या बाबतीतील विचार अंतिम टप्प्यात असून या निविदांबाबत सोमवारी होणाऱ्या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नव्या कंपनीची नेमणूक करण्यात येत असून ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. ए. खान यांनी सांगितले.आवडीचे महाविद्यालय मिळेलतेरावी आॅनलाईन रजिस्ट्रेशनमध्ये दहा महाविद्यालयांची नावे द्यावी लागतात. यातील आवडत्या दहा महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही तर विद्यार्थ्यांना पुन्हा रजिस्ट्रेशन करावे लागते. शिवाय तीन लिस्टपर्यंत विद्यार्थ्यांच्या रजिस्ट्रेशनची मुदत संपते. प्रवेशासाठी आॅनलाईन रजिस्ट्रेशन अनिवार्य असल्यामुळे अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता होती. यावर उपाय म्हणून ‘अदर कॉलेज’ असा पर्याय देण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली. युवा सेनेचे माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी यासंबधी निवेदन दिले होते.