शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याचे कातडे तस्करी प्रकरणात तिसरा आरोपी गजाआड

By admin | Updated: September 3, 2014 01:12 IST

वरुड वनपरिक्षेत्रात ३१ आॅगस्ट रोजी वन कर्मचाऱ्यांनी सापळा रचून बिबट्याच्या कातडाची तस्करी प्रकरणीदोघांना सिनेस्टाईल पकडून बिबट्याचे कातडे जप्त केले. यातील पसार तिसऱ्या आरोपीला जलालखेडा येथून

वरुड वनपरिक्षेत्रातील घटना : आरोपींना पाच दिवसांची वनकोठडी संजय खासबागे - वरुडवरुड वनपरिक्षेत्रात ३१ आॅगस्ट रोजी वन कर्मचाऱ्यांनी सापळा रचून बिबट्याच्या कातडाची तस्करी प्रकरणीदोघांना सिनेस्टाईल पकडून बिबट्याचे कातडे जप्त केले. यातील पसार तिसऱ्या आरोपीला जलालखेडा येथून सोमवारच्या रात्री अटक करण्यात आली असून न्यायालयाने आरोपींना पाच दिवसांची वनकोठडी दिली आहे. वरुड तालुक्यात मध्यप्रदेश सीमेवर मोठे जंगल आहे. या जंगलात अनेकदा नागरिकांना वाघांचे दर्शन घडते. गत वर्षी पांढऱ्या पट्टेदार वाघाचा मृत्यू झाला तर काही दिवसांपूर्वी एका बिबट्याचा जामगाव (महेंद्री) तलावावर मृत्यू झाला. या घटनेची शाही सुकत नाही तोच पुन्हा वाघाच्या कातड्याची तस्करी करणारी टोळी सक्रिय झाल्याची माहिती वनकर्मचाऱ्यांना मिळाली. या माहितीच्या आधारे गत एक महिन्यांपासून तस्करांचा शोध सुरु होता. यासाठी बनावट ग्राहक म्हणून कागदी नोट घेऊन सापळा रचण्यात आला होता. कातडे खरेदी करण्यासाठी या तस्कारांसोबत ९० लाखांचा सौदा वनविभागाने बनावट ग्राहक पाठवून केला होता. हा सौदा निश्चित झाल्यानंतर ३१ आॅगस्ट रोजी सकाळपासून वरुड ते आमनेरपर्यंत मार्गावर साध्या वेशात वनकर्मचारी तैनात होते. वनपाल अमोल चौधरी, वनरक्षक आशीष चक्रवर्ती, डि.एच. वाळके, भारत अळसपुरे, विशाल अंबागडे, इंद्रजित बारस्कर, एम.एस. राऊत, डी.जी. राऊत, ए.डी. खेडकर, वर्षा हरणे व घुमाळे यांनी खासगी वाहन घेऊन बिबट्याच्या कातडाची तस्करी करणाऱ्यांच्या वाहनाचा काटोलपासून पाठलाग केला. सापळा रचून बनावट व्यापारी बनून ते गेले आणि टोळीतील दोन आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून बिबट्याचे कातडे जप्त केले. बाजारभावाप्रमाणे या कातड्याची किंमत दीड लाख रुपये असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले. आरोपींनी वापरलेली मारुती व्हॅन क्र. एम.एच.४०-के.आर. १०६७ जप्त करण्यात आली आहे. सदर बिबट हा अडीच फूट उंचीचा असल्याचा अंदाज आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये काटोल येथील फिरोज शहा बब्बू शहा (३१, रा. बुधवारपेठ काटोल), दिनेश गजानन बेलखेडे (२४, रा. लाडगाव ता. काटोल) या दोघांचा समावेश होता. वन विभागाच्या पथकाने पसार झालेला तिसरा आरोपी प्रशांत उर्फ गोलू नांदेकर (३१) याला जलालखेडा येथून सोमवारी रात्री अटक केली. ही कारवाई मुख्य वनसंरक्षक संजय गौड यांच्या मार्गदर्शनात उपवनसरंक्षक निनू सोमराज, दक्षता पथकाचे उपवनसरंक्षक सी.टी. मोरणकर, अनंत गावंडे, परतवाड्याचे हरिश्चंद्र पडगव्हाणकर आणि मोर्शीचे वनाधिकारी अशोक कविटकर, संजय बनसोड आदींनी संयुक्तरीत्या केली.