शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

भरदुपारी चोरट्यांनी केला महिलेचा गळा चिरून खून

By admin | Updated: May 26, 2016 18:51 IST

चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी सोने पळविताना आरडाओरडा केलेल्या महिलेचा तीक्ष्ण हत्याराने गळा चिरुन खून केला

ऑनलाइन लोकमतलातूर, दि. 26- उदगीर येथे गुरुवारी भर दुपारी एक वाजण्याच्या सुमाराला चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी सोने पळविताना आरडाओरडा केलेल्या महिलेचा तीक्ष्ण हत्याराने गळा चिरुन खून केला. चोरट्यांच्या या हल्ल्यात मयत महिलेचा १५ वर्षाचा मुलगाही गंभीर जखमी झाला आहे़ प्रणिता प्रशांत पेन्सलवार (वय ४४) असे मयत महिलेचे नाव आहे.

उदगीर शहरातील शेल्लाळ रोडवरील येथील प्रशांत पेन्सलवार यांच्या घरी गुरुवारी दुपारी एकच्या त्यांची पत्नी प्रणिता व मुलगा सोहम (१५) हे दोघेच होते़ यावेळी तीन अज्ञात युवकांनी ‘सावकारांनी (मयत महिलेच्या पतीने) एसी दुरुस्त करण्यास सांगितले आहे’, असे प्रणिता पेन्सलवार यांना सांगितले़ त्यामुळे त्यांनी तिघांना एसी दाखविली़ एसी पाहण्याचा बहाणा करुन ते तपास असताना त्यांनी पाणी मागितले. १५ वर्षीय सोहम पाणी आणण्यासाठी दुसऱ्या खोलीत गेला असता या तिघांनी प्रणिता यांना धाक दाखवून त्यांच्या अंगावरील दागिणे ओरबाडले़ घाबरलेल्या प्रणिता यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली़ तेव्हा तिघांनी तीक्ष्ण हत्याराने त्यांचा गळा चिरला आणि पलायन करण्यास सुरुवात केली़ दरम्यान, आईचा आवाज ऐकून सोहम धावत येत असताना त्याच्याही हातावर तिघांनी हातातील हत्यारांनी वार केला़ त्यात तोही गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र त्याची आई प्रणिता यांना या हल्ल्यात आवाजही करता आला नाही. त्यांचा गळा इतक्या निर्दयी पध्दतीने चिरला गेला होता की शरीरापासून शीर वेगळे होता होता वाचले होते. भर दुपारी पेन्सलवार यांच्या कुटुंबातील आरडाओरड ऐकून शेजारची मंडळी धावून आली़ तोपर्यंत तिघेही अज्ञात चोर पसार झाले होते़ घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी कबाडे यांच्यासह स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे़ पेन्सलवार हे मोठे किराणा व्यापारी ...उदगिरात प्रशांत पेन्सलवार हे प्रसिध्द किराणा व्यापारी आहेत. त्यांचे मुख्य मार्केटमध्ये दुकान आहे. त्यांचे उदगिरात काही वर्षांपासून दुकान आहे. त्यामुळे लक्ष ठेवून चोरट्यांनी घरावर दरोडा टाकण्याची शक्यता पोसिल वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.