शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
3
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
4
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
5
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
6
Latest Marathi News LIVE: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प
7
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
8
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
9
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
10
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
11
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
12
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
13
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
14
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
15
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
16
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
17
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
18
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
19
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
20
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

चोरांनी ग्राहक बनून केले कपडे लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2016 02:09 IST

सणासुदीच्या काळात खरेदीसाठी सर्वच बाजारात मोठी गर्दी पाहायला मिळतेय.

मुंबई : सणासुदीच्या काळात खरेदीसाठी सर्वच बाजारात मोठी गर्दी पाहायला मिळतेय. त्यातच ग्राहकाचे सोंग घेऊन दुकानात जात महागड्या वस्तू लंपास करणाऱ्या चोरांच्या टोळ्या देखील सक्रिय झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्याचा फटका शनिवारी कांदिवलीच्या मॉलमधील एका दुकानाला बसला. चार अनोळखी इसमांनी हजारोंचे महागडे कपडे पळवून नेले. याबाबत समता नगर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कांदिवलीच्या ग्रोव्हल्स मॉलमध्ये असलेल्या झोडियाक नामक दुकानात हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी तळ मजल्यावर असलेल्या या दुकानात पाऊणे तीनच्या सुमारास वीस ते पंचवीस वयोगटातील चार अनोळखी इसम शिरले. त्यावेळी दुकानात रामचंद्र बागवे (२८)हे सेल्समन एकटेच होते. यातील एकाने बागवे यांना बोलण्यात गुंतवले तर उर्वरित तिघांनी शर्ट आणि पॅन्ट ट्राय करण्याचा बनाव करत ट्रायल रूम मध्ये नेले. बरेच कपडे पाहिल्यानंतर ते पसंत न पडल्याचे सांगत ते बाहेर पडले. त्यांच्या मागोमाग चौथा इसमही बाहेर पडला. तेव्हा ट्राय केलेले कपडे पुन्हा रॅकमध्ये लावण्याच्या उद्देशाने बागवे ट्रायल रूममध्ये गेले तेव्हा कपडे गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी दुकानातील सर्व कपडे मोजले आणि पुन्हा स्टॉक तपासला. तेव्हा महागडया ब्रँडचे सोळा ते सतरा कपडे गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी मालकांना कळविले. आणि पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मुख्य म्हणजे या दुकानात सीसीटीव्ही तसेच स्कॅनर मशिनही नाही, ही बाब चोरांना माहित असावी. त्यानुसार त्यांनी या दुकानाला टार्गेट केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जातोय. त्यानुसार चार अनोळखी इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी अधीक चौकशी सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)>सीसीटीव्ही अस्पष्ट !दुकानात सीसी टीव्ही नसल्याने मॉलच्या मुख्य प्रवेश द्वारावरचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी पडताळून पाहिले. ज्यात ते संशयित इसम दिसत आहेत. मात्र ते फारच अस्पष्ट असल्याने पोलिसांना त्यांची ओळख पटविण्यात अडथळे येत असल्याचे त्यांनी सांगितले.