शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

‘ते’ १४ कोटी परत गेले !

By admin | Updated: December 8, 2014 02:33 IST

गारपीटग्रस्त शासनाच्या आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत असताना प्रशासकीय यंत्रणेच्या उदासीनतेमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वाट्याचा तब्बल १४ कोटी रुपयांचा निधी परत गेला आहे.

अहमदनगर : गारपीटग्रस्त शासनाच्या आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत असताना प्रशासकीय यंत्रणेच्या उदासीनतेमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वाट्याचा तब्बल १४ कोटी रुपयांचा निधी परत गेला आहे. पाच तालुक्यांना तर नऊ महिन्यानंतर शेतकरी आर्थिक मदतीपासून वंचित राहिल्याचा साक्षात्कार झाल्याने त्यांच्याकडून पुन्हा निधीची मागणी करण्यात आली आहे़ शासनाने खरिपाची ५० पैसेपेक्षा कमी पैसेवारी असणाऱ्या गावांना कर्ज वसुली व वीज बिलात माफी दिली़ नगर जिल्ह्यात खरिपाची ५० पेक्षा कमी पैसेवारी असणारी ३०५ गावे आहेत़ या गावांतील शेतकऱ्यांना संबंधित सवलतीही लागू झाल्या़ परंतु मागील वर्षी मार्च महिन्यात जिल्ह्यात गारपीट व अवकाळी पाऊस झाला़ गारपिटीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले़ त्यासाठी शासनाने तातडीने आर्थिक मदत जाहीर केली़ त्यानुसार गारपीटग्रस्त शेतकऱ्यांसाठी १४८ कोटी २० लाख रुपये प्रशासनास प्राप्त झाले़ जिल्हा प्रशासनाने चार टप्प्यांत हा निधी तहसील कार्यालयाकडे वर्ग केला़ तहसील कार्यालयाने तालुक्यातील पिकांचे पंचनामे करून नियमानुसार शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे अपेक्षित होते़ परंतु तहसील कार्यालयाने हात आखडता घेतला़ त्यामुळे तहसील कार्यालयाची तिजोरी पैशांनी भरली खरी पण शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचलीच नाही़ आर्थिक मदत मिळावी, यासाठी शेतकऱ्यांनी वेळोवेळी मोर्चे व आंदोलने केली़ अनेक शेतकरी गारपिटीच्या आर्थिक मदतीपासून वंचित असल्याचे उघड झाल्याने तालुका प्रशासनाने पुन्हा शोध सुरू केला़ त्यात पाच तालुक्यांत गारपिटीमुळे नुकसान झालेले २ हजार ४०० शेतकरी निधीपासून वंचित राहिल्याचे आढळले. त्यांच्यासाठी १ कोटी २० लाख रुपयांचा निधी पुन्हा मागण्यात आला. जिल्ह्यातील दीड लाख शेतकऱ्यांनाच मदत मिळाली. लाभापासून बहुतांश तालुक्यातील शेतकरी अजूनही वंचित असल्याने मदतीची मागणी होत आहे़शासनाकडून १४८ कोटी २० लाख रुपये प्राप्त झाले़ यापैकी चार टप्प्यांत १२६ कोटी २७ लाख वितरीत केले गेले़ मात्र तहसील कार्यालयांनी २१ कोटी ७९ लाख रुपये जिल्हा प्रशासनास परत केले़ जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतून गारपिटीसाठी दिलेला निधी परत गेला. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांकडून निधीची मागणी होत असतानाच निधी परत का पाठविला, असा सवाल शेतकरी करीत आहेत. (प्रतिनिधी)