शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

‘ते’ स्मशानभूमीत साजरा करतात जन्मदिवस !

By admin | Updated: January 25, 2015 01:00 IST

जन्मदिवस हा प्रत्येकाच्याच आयुष्यातील अविस्मरणीय दिवस. त्यामुळेच प्रत्येक जण आपला वाढदिवस छोट्यामोठ्या स्वरूपात का होईना, पण साजरा करतोच.

रोहितप्रसाद तिवारी - मोर्शी (अमरावती) जन्मदिवस हा प्रत्येकाच्याच आयुष्यातील अविस्मरणीय दिवस. त्यामुळेच प्रत्येक जण आपला वाढदिवस छोट्यामोठ्या स्वरूपात का होईना, पण साजरा करतोच. मात्र हा दिवस जगावेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा काहींचा प्रयत्न असतो. मोर्शी तालुक्याच्या हिवरखेड गावातील नारायणराव मेंढे ही अशीच जगावेगळी व्यक्ती. गेल्या अनेक वर्षांपासून ते स्वत:चा जन्मदिवस स्मशानभूमीत साजरा करतात. त्यात शाळकरी मुले-मुलीही सामील होतात. स्मशानभूमीला शांतीवनात परावर्तित करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरूआहेत.नारायणराव यांच्यावर सुरुवातीला तुकडोजी महाराजांच्या विचारांचा प्रभाव होता. तुकडोजी महाराजांच्या गुरुदेव सेवा मंडळाचे ते कार्यकर्ते देखील होते. पुढे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) विचारांनी प्रभावित होऊन ते या चळवळीत सामील झाले. अंनिस आणि तुकडोजी महाराजांचे विचार समाजात रुजवीत असताना त्यांनी वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाकडे लक्ष केंद्रित केले. हिवरखेड गावातील रस्त्याच्या दुतर्फा त्यांनी विविध प्रजातींची रोपटी लावून त्यांचे संगोपन केले. आज त्या रोपट्यांचे वृक्षांत रूपांतर झाले. हिवरखेड येथील स्मशानभूमीची जागा ओकीबोकी पडलेली होती. मेंढे यांनी या स्मशानभूमीचा कायापालट करण्याचे ठरविले. समाजातील दानशूरांची त्यांनी याकामी मदत घेतली. स्मशानभूमीच्या आवारात वृक्षलागवड केली. त्यामुळे स्मशानभूमीचे चित्रच पालटले आहे. याच स्मशानभूमीत ते आपला जन्मदिवस साजरा करतात.स्मशानात भूतप्रेतांचा वावर असल्याची शाळकरी विद्यार्थ्यांना वाटणारी भीती त्यांच्या मनातून घालविण्याच्या उद्देशाने स्वत:चा जन्मदिन मी स्मशानभूमीत साजरा करतो. मित्रमंडळींसोबत विद्यार्थ्यांनाही आवर्जून आमंत्रित करतो.- नारायणराव मेंढे