शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
5
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
6
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
7
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
8
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
9
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
10
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
11
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
12
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
13
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
14
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
15
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
16
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
17
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
18
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
19
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
20
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल

झेंडावंदन होणार आता लोकप्रतिनिधींच्याहस्ते

By admin | Updated: April 30, 2015 00:30 IST

महाराष्ट्र दिन : शासकीय अधिकाऱ्यांची परंपरा निघणार मोडीत

संकेत गोयथळे - गुहागर राज्यात १५ आॅगस्ट (स्वातंत्र्य दिन) व २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन) या राष्ट्रीय कार्यक्रमांबरोबरच १ मे हा महाराष्ट्र स्थापनेचा दिवस (महाराष्ट्र दिन) तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदारांच्याहस्ते ध्वजारोहण करुन साजरा होत होता. यामध्ये आता शासनाने बदल केला असून महाराष्ट्र दिनी आता लोकप्रतिनिधींना हा मान मिळणार आहे. तसा शासन आदेश (परिपत्रक) शासनाने जारी केला आहे.परिपत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र दिनी मुंबई येथील मुख्य शासकीय कार्यालयाच्या ठिकाणी मा. राज्यपाल महोदयांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात येते. त्याचप्रमाणे विभागीय आयुक्तालयांच्या मुख्यालयी आणि जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी संबंधित पालकमंत्री महोदयांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात येते.याबाबत तालुक्याच्या मुख्यालयी तहसीलदार यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात येते. याबाबत तालुक्यांच्या मुख्यालयी शासकीय अधिकाऱ्यांच्याऐवजी लोकप्रतिनिधीच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात यावे, अशी अनेक दिवसांपासून लोकप्रतिनिधींची मागणी होती. त्या अनुषंगाने १ मे रोजीचा महाराष्ट्र दिनी आता तहसील कार्यालयाच्या ठिकाणी विधानसभा सदस्य / विधान परिषद सदस्य यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्याचा निर्णय आता राज्य शासनाने घेतला आहे.एकाच तहसील कार्यक्षेत्रात एकापेक्षा जास्त विधानसभा सदस्य निवडून येत असतील अशा ठिकाणी पहिल्या वर्षी जास्त मतदार संख्या असलेल्या मतदार संघाचे विधानसभा सदस्य ध्वजारोहण करतील व त्यापुढील वर्षी उतरत्या क्रमाने कमी मतदार संख्या असलेल्या मतदार संघाचे विधानसभा सदस्य ध्वजारोहण करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.हा निर्णय सध्या फक्त महाराष्ट्र दिनापुरता मर्यादित असून त्याची अंमलबजावणी येत्या महाराष्ट्र दिनापासून करण्यात यावी असे म्हटले आहे. हे परिपत्रक अपर मुख्य सचिव व मुख्य राजशिष्टाचार अधिकारी सुमित मल्लिक यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आला आहे.ध्वजारोहण करताना काही निकष ठरविले गेले असून यामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री हे जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी ध्वजारोहण करीत असल्यामुळे त्यांच्या मतदार संघातील तालुक्याच्या मुख्यालयी जिल्ह्यातील विधान परिषद सदस्य अथवा विधान परिषद सदस्य नसल्यास संबंधित तहसीलदार ध्वजारोहण करतील. ज्या विधानसभा मतदार संघामध्ये दोन तालुक्याचे कार्यक्षेत्र समाविष्ट असेल त्या ठिकाणी ज्या मतदार संघाची मतदार संख्या जास्त असेल त्या मतदार संघाचे विधानसभा सदस्य ध्वजारोहण करतील व कमी मतदार संख्या असलेल्या तालुक्याच्या ठिकाणी त्या जिल्ह्यातील विधान परिषद सदस्य अथवा विधान परिषद सदस्य नसल्यास तहसीलदार ध्वजारोहण करतील.