शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

माफीची साक्षीदार होणार

By admin | Updated: February 5, 2017 00:31 IST

‘मी केलेले पाप आणि संतोष पोळ याने केलेले गुन्हे मी सांगायला तयार आहे. रात्रभर मला झोप येत नाही, त्यावेळी जे काही घडलं ते सगळं माझ्या चेहऱ्यासमोर येतं, मला पश्चात्ताप

सातारा : ‘मी केलेले पाप आणि संतोष पोळ याने केलेले गुन्हे मी सांगायला तयार आहे. रात्रभर मला झोप येत नाही, त्यावेळी जे काही घडलं ते सगळं माझ्या चेहऱ्यासमोर येतं, मला पश्चात्ताप होतोय म्हणून मी खरीखुरी हकीकत न्यायालायात सांगायला तयार आहे,’ असे सांगून ज्योती मांढरे हिने आपण माफीचा साक्षीदार होण्याची कबुली न्यायालयात दिली. विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी शनिवारी प्रथमच जिल्हा न्यायालयात उपस्थित राहून सरकार पक्षाची बाजू मांडली.वाई येथील संतोष पोळ याने २००३ ते २०१६ या १३ वर्षांच्या कालावधीत सहा खून करून मृतदेह पुरल्याचा छडा सातारा पोलिसांनी लावला. या घटनेने राज्यात खळबळ उडाली होती. सहापैकी तीन खुनांमध्ये ज्योतीचा समावेश असल्याचे उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात सांगितले. हा सर्व खटला परिस्थितीजन्य असल्याने ज्योती मांढरे हिला न्यायालयाने माफीचा साक्षीदार करावे. पोळ हा मुख्य आरोपी असल्याने या दोघांची भेट झाली तर तो ज्योतीवर दबाव आणण्याची शक्यता लक्षात घेता या दोघांना कारागृह प्रशासनाने भेटू दिले जाऊ नये, असा युक्तिवाद उज्ज्वल निकम यांनी केला. (प्रतिनिधी)या हत्याकांडात संतोष पोळ हा मुख्य आरोपी आहे. त्यामुळे माफीच्या साक्षीदाराविषयी हरकत घ्यायचा त्याला कायदेशीर अधिकार नाही. ज्योती मांढरेला जर माफी दिली आणि तिने सर्व हकीकत न्यायालयात सांगितली तर तिची माफी कायम राहील. न्यायालयाने माफी दिली तर या दोघांना परस्परांशी बोलण्याची परवानगी देण्यात येऊ नये. - अ‍ॅड. उज्ज्वल निकम, विशेष सरकारी वकील