शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणात वेदाभ्यास असावा

By admin | Updated: January 20, 2017 00:39 IST

सामान्य व्यक्तीलाही वेद समजावेत, म्हणता यावेत, यासाठी शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठ स्तरावर वेदांचे अध्ययन व अध्यापन सुरू व्हावे

पुणे : सामान्य व्यक्तीलाही वेद समजावेत, म्हणता यावेत, यासाठी शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठ स्तरावर वेदांचे अध्ययन व अध्यापन सुरू व्हावे, अशी अपेक्षा योगगुरू रामदेवबाबा यांनी व्यक्त केली. वैदिक परंपरा सर्वसामान्यांनाही समजावी म्हणून लवकरच भारतीय शिक्षा बोर्डाची स्थापना करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.वेदाचार्य घैसासगुरुजी वेदपाठशाळेत गुरुवारी आयोजित वेदमहर्षी कै. विनायकभट्ट घैसास गुरुजी जन्मशताब्दी सांगता समारंभात ते बोलत होते. ज्योतिषपीठाधीश्वर शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज, वेदमूर्ती मोरेश्वर घैसास गुरुजी, महापौर प्रशांत जगताप, बँक आॅफ महाराष्ट्रचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे, सुभाषचंद्र, अभ्यंकर उपस्थित होते. रामदेवबाबा म्हणाले, ‘‘मी वैदिक आहे. योगाचार्यही आहे. कर्मयोगीसुद्धा आहे. संपूर्ण जीवन मी वेद व योगकार्यासाठी समर्पित केले आहे. वैदिकशास्त्राला ग्लॅमर नाही; पण ही विद्या गौरवास्पद आहे. कारण, वैदिकांच्या तपश्चर्येने वेदांची परंपरा आजपर्यंत जपली आहे.’’शंकराचार्य महाराज म्हणाले, ‘‘लॉर्ड मेकॉलेने भारतीयांना नोकर बनविले तेव्हापासून नोकरी मिळावी, हीच भावना भारतीयांमध्ये रुजली. पण, येथून पुढे मी मालक कसा होईन, हीच भावना भारतीयांनी जपली पाहिजे. युवा पिढीने नोकरी न करता स्वत:चे उद्योग करावेत.’’वेदमूर्ती मोरेश्वर घैसासगुरुजी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)>सुभाषचंद्र म्हणाले, ‘‘वेदांमध्ये भारताची संस्कृती जपलेली आहे. अशा योगातूनच मीदेखील मोठा माणूस झालो आहे. मनुष्य कसा आहे, तो कोण आहे, हे वेदांमुळे शिकलो. जो विश्वाचा विचार करतो, तो मनुष्य म्हटला जातो. तसेच, जो वेदांचा विचार करतो, त्याला देव म्हटले जाते.’’