शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा नोकरीत घेतल्यावर मागचा पगार नाही

By admin | Updated: March 6, 2017 05:06 IST

अभियंत्यांना बडतर्फीच्या काळाचा पगार न देण्याचा महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचा (महावितरण) निर्णय उच्च न्यायालयाने योग्य ठरविला

मुंबई : भ्रष्टाचाराच्या आरोपावरून बडतर्फ केलेल्या परंतु नंतर निर्दोष सुटल्यावर पुन्हा कामावर घेतलेल्या दोन कनिष्ठ अभियंत्यांना बडतर्फीच्या काळाचा पगार न देण्याचा महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचा (महावितरण) निर्णय उच्च न्यायालयाने योग्य ठरविला आहे.असा पगार मिळावा यासाठी मोहन मोरेश्वर आगाशे (दापोली, जि. रत्नागिरी) आणि रामचंद्र बापुसाहेब देसाई (कुपवाड, सांगली) या दोन कनिष्ठ अभियंत्यांनी केलेल्या रिट याचिका न्या.सत्यरंजन धर्माधिकारी व न्या. बी. पी. कोलाबावाला यांनी दोन स्वतंत्र निकालपत्रांव्दारे फेटाळल्या.’महावितरण’ने त्यांच्या सेवानियमांतील नियम क्र. १०एच्या आधारे या दोन्ही अभियंत्यांना भ्रष्टाचार खटल्यात निर्दोष ठरल्यावर पुन्हा सेवेत घेतले होते. परंतु ‘नो वर्क, नो पे’ या तत्त्वानुसार त्यांना बडतर्फीच्या काळाचा पगार दिला नव्हता. मात्र त्यांचे सेवासातत्य व सेवाज्येष्ठता कायम ठेवली होती. या नियमात व त्यानुसार ‘महावितरण’ने घेतलेल्या निर्णयात काहीच चूक नाही, असे न्यायालयाने म्हटले. नियमांत तरतूद नसताना हे कर्मचारी ज्या काळात कामच केले नाही त्या काळाचा पगार मागू शकत नाहीत व ‘महावितरण’ही त्यांना असा पगार देऊ शकत नाही, असे खंडपीठाने नमूद केले.आगाशे यांना एका ग्राहकाकडून पाच हजार रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपावरून ४ डिसेंबर २००८ रोजी बडतर्फ केले गेले होते. न्यायालयाने निर्दोष ठरविल्यावर त्यांना २८ फेब्रुवारी २०१२ रोजी पुन्हा सेवेत घेण्यात आले होते. या दरम्यानच्या काळाचा २० लाख रुपये पगार मिळावा, यासाठी त्यांनी याचिका केली होती.देसाई यांनाही एका ग्राहकाकडून नव्या वीज जोडणीसाठी लांच मागितल्याच्या आरोपावरून २७ सप्टेंबर २०१० रोजी बडतर्फ करून ३ मे २०१२ रोजी पुन्हा कामावर घेतले गेले होते.या याचिकांवरील सुनावणीत आगाशे यांच्यासाठी अ‍ॅड. सीमा सरनाईक यांनी, देसाई यांच्यासाठी अ‍ॅड. उमेश मानकापुरे यांनी तर ‘महावितरण’साठी अ‍ॅड. एआरएस बक्षी यांनी काम पाहिले. (विशेष प्रतिनिधी)>आधीचा निकाल चुकीचाअशाच एका प्रकरणात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बडतफीर्नंतर पुन्हा सेवेत घेतलेल्या विजय भाऊरावजी अमले या कर्मचाऱ्यास बडतर्फीच्या काळाचा पगार देण्याचा आदेश १७ मार्च २००९ रोजी ‘महावितरण’ला दिला होता. परंतु तो निकाल ‘महावितरण’च्या सेवानियमांमधील नियम क्र. १०ए विचारात न घेता दिला गेला होता, असे आता या दोन याचिकांवरील सुनावणीच्या वेळी निदर्शनास आले.