मतदान यंत्रणेचे नियोजन नाही
By admin | Updated: January 25, 2017 22:43 IST
एका मतदान केंद्रावर ४ पेक्षा अधिक यंत्रे असू शकतात, हे गृहीत धरून या दृष्टीने नियोजन झाले नसल्याचे प्रत्यक्ष काम करणाºया जाणकारांचे गाºहाणे आहे.
मतदान यंत्रणेचे नियोजन नाही
पुणे : महापालिका निवडणुकीसाठी १०० टक्के मतदान होईल, असे गृहीत धरून पुरेशी यंत्रणा नियोजित न करता पालिका निवडणुकीत कमी मतदान होईल, असे गृहीत धरण्यात आले आहे. एका मतदान केंद्रावर ४ पेक्षा अधिक यंत्रे असू शकतात, हे गृहीत धरून अधिकारी, कर्मचाºयांचे काम सुलभ व्हावे, या दृष्टीने नियोजन झाले नसल्याचे या यंत्रणेत प्रत्यक्ष काम करणाºया जाणकारांचे गाºहाणे आहे.
सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० ही मतदानाची वेळ आहे. मात्र, दिवसभरात कोणत्याही वेळी केंद्रावर रांगा लागण्याची, कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे एखाद्या केंद्रावर जास्त गर्दी होण्याची शक्यता असते. प्रभाग पद्धतीमध्ये होणाºया मतदानामध्ये एका मतदाराला चारही मते देणे आवश्यक आहे. चार मते दिल्यानंतरच कंट्रोल पॅलेट दुसºया मतदारासाठी खुले होणार आहे. त्यामुळे एखाद्या मतदाराने कमी मते देणे, चुकीचे बटण दाबले जाणे, अशिक्षित मतदारांना मतदान कसे करावे याची माहिती देण्यामध्ये वेळ द्यावा लागणे, असे प्रकार होऊ शकतात.
एका मतदान केंद्रावर मतदाराचे नाव यादीमध्ये पडताळून पाहणे, मतदार स्त्री-पुरुष असल्यास तशी नोंद करून तर्जनीला शाई लावणे, सर्व यंत्रांचे कंट्रोल युनिट नियंत्रित करणे आणि ही सर्व प्रक्रिया योग्य पद्धतीने पार पडते किंवा कसे हे पाहणे, अशा स्वरूपाचे मतदान यंत्रणा काम करते.
एका मतदानासाठी साधारणत: ४० ते ५० सेकंद लागतात. मतदार ज्येष्ठवयीन असल्यास किंवा अशिक्षित असल्यास त्यापेक्षा अधिक वेळ लागत असल्याचे या यंत्रणेतील जाणकारांचे निरीक्षण आहे. कागदी मतपत्रिकेवर शिक्का मारण्याची पद्धत असताना एका केंद्रावर केंद्राध्यक्षासह ५ निवडणूक कर्मचारी असत. मतदान होईपर्यंत या कर्मचारी व अधिकाºयांना जेवण करणे, नैसर्गिक विधीसाठी केंद्राबाहेर जाणे यांवर मोठी मर्यादा येते.
एखाद्या केंद्रामध्ये कर्मचारी, अधिकारी अचानक आजारी होण्याची शक्यता गृहीत असते. त्यासाठी पर्यायी मनुष्यबळ प्रत्येक शाळेत एक या संख्येने तरी असले पाहिजे. मात्र, मुख्यालयात हे राखीव मनुष्यबळ ठेवले जाते. त्यामुळे एखाद्या ठिकाणी राखीव कर्मचारी नेमण्याची वेळ आली, तरी त्या वेळेपर्यंत मतदान प्रक्रिया थांबून राहण्याची शक्यता असते.
पालिका निवडणुकांमध्ये विशेषत: झोपडपट्टी प्रभागातील काही गटांमध्ये अधिक उमेदवार असू शकतात. काही ज्या गटामध्ये ११ पेक्षा अधिक उमेदवार आहेत, त्या
के ंद्रांमध्ये यंत्रांची संख्या वाढल्यास निवडणूक अधिकाºयांची संख्या कमी असल्याने ताण येऊ शकतो, असे या जाणकारांचे म्हणणे आहे.