शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

दहा लाख देऊनही उमेदवारी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2017 23:55 IST

पक्षाची उमेदवारी देण्यासाठी २ लाख रुपयांची इच्छुकांकडे मागणी करणाऱ्या भाजपाच्या शहर सरचिटणीसाची ध्वनीचित्रफीत व्हायरल झाल्याने उठलेले वादळ शांत होत नाही तोच

नाशिक : पक्षाची उमेदवारी देण्यासाठी २ लाख रुपयांची इच्छुकांकडे मागणी करणाऱ्या भाजपाच्या शहर सरचिटणीसाची ध्वनीचित्रफीत व्हायरल झाल्याने उठलेले वादळ शांत होत नाही तोच, १० लाख रुपये देऊनही पक्षाने उमेदवारी न दिल्याचा आरोप करणारी भाजपाच्या कामगार आघाडीचे प्रदेश उपाध्यक्षांची नवीन ध्वनीचित्रफीत व्हायरल झाल्याने भाजपाचे नेतृत्व अडचणीत आले आहे. विशेष म्हणजे २ लाख रुपये पक्ष निधीसाठी मागितल्याचे समर्थन करणाऱ्या भाजपाच्या एका आमदारांसमक्षच हा आरोप झाल्याने आता त्याचे समर्थन कसे करावे, असा प्रश्न भाजपा नेत्यांसमोर उभा ठाकला आहे. भाजपाच्या ‘वसंत स्मृती’ कार्यालयातच महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी शहर सरचिटणीस नाना शिलेदार यांनी एका इच्छुकाकडे उमेदवारी हवी असेल तर २ लाख रुपयांची मागणी केल्याची ध्वनीचित्रफीत सोशल माध्यमावर व्हायरल झाली होती. ‘पार्टी विथ डिफरन्स’ म्हणवणाऱ्या भाजपाने उमेदवारी वाटप करताना बाजार मांडल्याची सर्वत्र टीका होऊ लागल्यावर आमदार देवयानी फरांदे यांनी मात्र या पैसे मागण्याच्या कृतीचे समर्थन केले व सदरचे पैसे उमेदवारांच्या प्रचारासाठीच गोळा केले जात असल्याचे सांगितले होते. प्रत्येक उमेदवाराकडून २ लाख रुपये अधिकृत घेतले गेल्याचे त्यांचे म्हणणे होते. अर्थात, त्यांच्या या समर्थनाशी कोणी सहमत नसले तरी, भाजपाची उमेदवारी देताना मोठ्या प्रमाणावर पैसे घेतले गेल्याच्या होणाऱ्या आरोपांना पृष्ठी देणारी दुसरी ध्वनीचित्रफीत सोशल माध्यमावर व्हायरल झाल्याने भाजपासाठी तो मोठा धक्का मानला जात आहे. भारतीय जनता पार्टीच्या कामगार आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष गोपाळ पाटील हे प्रभाग क्रमांक २३मधून इच्छुक होते, पक्षाने त्यांना डावलून अलीकडेच पक्ष प्रवेश झालेल्या चंद्रकांत खोडे यांना उमेदवारी दिली आहे. त्याचाच संदर्भ देत व्हायरल झालेल्या या ध्वनीचित्रफितीत गोपाळ पाटील यांनी पक्षाला १० लाख रुपये देऊनही आपल्याला उमेदवारी न दिल्याबद्दल व्यक्त केलेला संताप दिसत आहे. त्यांच्या या संतापाला आमदार देवयानी फरांदे या साक्षीदार असल्याचे दाखविण्यात आले असून, पाटील यांच्यावर झालेल्या अन्यायाबाबत मात्र त्या शांत आहेत. साधारणत: दीड मिनिटाच्या या ध्वनीचित्रफितीमुळे भाजपाला अन्य राजकीय पक्षांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. मनसेच्या अभ्यंकरांविरुद्ध तक्रारव्हिडीओत आरोप करताना दिसलेले भाजपाचे कामगार संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष गोपाळ पाटील यांनी यासंदर्भात इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. त्यात सोशल मीडियावर माझा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सदर व्हिडीओत माझे काही शब्द कट करून ही क्लिप व्हायरल केली जात आहे. ही व्हिडीओ क्लिप मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर यांच्या फोनवरून प्रसारित झाली असून, त्यामुळे या क्लिपची सत्यता पडताळून खोडसाळपणा करणाऱ्यांना शासन करावे, असे तक्रारीत म्हटले आहे.भाजपाचा व्हिडीओ मध्यरात्रीपासूनच व्हायरल झाला होता. व्हायरल झालेला व्हिडीओ माझ्याकडे आल्यानंतर मी तो खात्री करण्यासाठी एकाला पाठविला. एखाद्या गोष्टीची खात्री करणे यात गैर काय? मुळातच हा व्हिडीओ भाजपाशी संबंधित आहे, तेथे मनसेच्या कार्यकर्त्यांनी जाऊन व्हिडीओ तयार केलेला नाही. त्यामुळे व्हिडीओ कोणी तयार केला येथून चौकशी व्हावी. तो एडीट करण्याइतपत माझे तांत्रिक ज्ञान नाही. बरे तर हा दुसरा व्हिडीओ असून यापूर्वीदेखील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने आणि मुख्यमंत्र्यांनीच या दोन्ही व्हिडीओची सखोल चौकशी करावी.- अविनाश अभ्यंकर, शहर संपर्काध्यक्ष, मनसेकेंद्रात व राज्यात पारदर्शकतेच्या गोष्टी करणाऱ्या भाजपाने तिकीट विक्रीचा मांडलेला बाजार पाहता, त्यांच्यातील पारदर्शकता कोठे गेली? पक्षाच्या उमेदवारांकडून पैशांची मागणी करून तिकीट विक्री केली जात असेल तर निवडून आलेले पक्षाचे नगरसेवक महापालिकेचा कारभार पारदर्शकतेने करतील अशी अपेक्षा कशी ठेवता येईल? - रंजन ठाकरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉँग्रेस