शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कारित महिलेसोबत महिला अधिकारी नाही

By admin | Updated: June 6, 2017 02:05 IST

महिलेची वैद्यकीय तपासणीसाठी सोबत जाण्यास महिला पोलीस अधिकारी उपलब्ध नसल्याने वैद्यकीय तपासणीच रखडल्याची तक्रार करण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विवाह करण्याचे आश्वासन देत महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून नितीन पांचाळ या आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करणाऱ्या चारकोप पोलीस ठाण्यात पिडीत महिलेची वैद्यकीय तपासणीसाठी सोबत जाण्यास महिला पोलीस अधिकारी उपलब्ध नसल्याने वैद्यकीय तपासणीच रखडल्याची तक्रार करण्यात येत आहे.विवाह करण्याचे वचन देत शरीरसंबंध ठेवून मोबाईलवर अश्लील छायाचित्रे काढल्याच्या आरोपावरून मालाड (पूर्व) येथील महेंद्र नगरातील नितीन पांचाळ याच्याविरूद्ध चारकोप पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या नितीन पांचाळ फरार झाला आहे. सहा वर्षांपूर्वी आपली नितीन पांचाळ याच्याशी ओळख झाली. आपण घटस्फोटीत असल्याचे सांगून नितीन पांचाळ याने आपल्याशी विवाह करण्याचे वचन दिले. त्या दरम्यान आपल्यासोबत शरीरसंबंध ठेवले. त्याचवेळी आपला विश्वास संपादन करून एक लाख रूपयांची मागणी केली. विवाह करण्याचे ठरले असल्याने आपण तीन टक्के व्याजाने त्याला कर्ज काढून दिले. बरेच दिवस ती रक्कम परत न केल्याने आपण विचारणा केली असता त्याने धमकावल्याचे तक्रारदार महिलेने तक्रारीत म्हटले आहे. पैसे मागितल्यानंतर पांचाळने मोबाईलमधील माझ्या नकळत काढलेले माझे अश्लील फोटो दाखवून ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली. काही फोटो त्याने आपल्या मोबाईलवरही पाठवल्याचे या महिलेने तक्रारीत म्हटले आहे. पोलीस तक्रार दाखल करण्यात टाळाटाळ करीत होते. मात्र राष्ट्रीय भ्रष्टाचार आणि अपराध निवारक परिषदेचे अध्यक्ष मोहन कृष्णन यांनी खासदार हुसेन दलवाई यांना निवेदन पाठवले. त्यावरून दलवाई यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले. मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेत कारवाईचे लेखी आदेश दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे गुन्हा दाखल असला तरी वैद्यकीय तपासणीसाठी सोबत जायला महिला पोलीस उपलब्ध नसल्याने २0 मे रोजी गुन्हा दाखल झाला तरी अद्याप वैद्यकीय तपासणी रखडल्याचे सांगण्यात येते.