शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

दिघ्यातील बांधकाम पाडण्यात आठकाठी नाही

By admin | Updated: January 17, 2017 06:08 IST

दिघ्याची बेकायदेशीर बांधकामे तोडण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती मागणार नाही

मुंबई : बेकायदेशीर बांधकामे नियमित करण्यासंदर्भात राज्य सरकारचे अंतिम धोरण तयार नसल्याने दिघ्याची बेकायदेशीर बांधकामे तोडण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती मागणार नाही, अशी थेट भूमिका राज्य सरकारने घेतल्याने उच्च न्यायालयाने दिघ्यातील सर्व बेकायदेशीर बांधकामांवर कायदेशीर कारवाई करण्याचा आदेश नवी मुंबई महापालिका, सिडको व एमआयडीसीला सोमवारी दिला. ३१ डिसेंबर २०१५ पर्यंतची सर्व बेकायदेशीर बांधकामे नियमित करण्यासंदर्भातील धोरण अंतिम होत नसल्याने न्या. अभय ओक व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठाने राज्य सरकारची चांगलीच कानउघाडणीही केली. या प्रस्तावित संरक्षण धोरणामुळे लोकांच्या आशा वाढत असून बेकायदा बांधकामांना प्रोत्साहन दिले जात आहे. आज २०१५ पर्यंतची बेकायदा बांधकामे नियमित करण्यात येतील. भविष्यात ही मुदत वाढत जाईल. २०१६, २०१७... अशी मुदतवाढ मिळतच राहील. त्यामुळे लोक बिनधास्तपणे बेकायदेशीर बांधकामे उभारत आहेत, अशा शब्दांत न्यायालयाने सरकारला फैलावर घेतले.उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही एकट्या नवी मुंबईत ४०० हून अधिक बेकायदा बांधकामे उभारण्यात आल्याची माहिती याचिकाकर्त्याच्या वकील अ‍ॅड. दत्ता माने यांनी खंडपीठाला दिली. यावरूनही खंडपीठाने राज्य सरकारला धारेवर धरले. ‘आदेशानंतर बेकायदेशीर बांधकामे उभी राहू नयेत, यासाठी केवळ या कामाकरिताच विशेष पोलीस नियुक्त करण्याचे निर्देश सरकारला दिले होते. सरकारने २० मे २०१६ रोजी तशी अधिसूचनाही काढली. मात्र अद्याप त्यावर अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. यावरूनच राज्य सरकारची वृत्ती दिसत आहे (बेकायदेशीर बांधकामांना प्रोत्साहन देण्याची),’ असेही खंडपीठाने संतप्त होत म्हटले.त्यावर महाअधिवक्ता रोहित देव यांनी राज्य सरकार नव्या बेकायदेशीर बांधकामांना संरक्षण देणार नाही, असे आश्वासन खंडपीठाला दिले. ‘नव्या संरक्षण धोरणाचा मसुदा सर्व महापालिका, नगरपंचायत, ग्रमापंचायतांकडे सूचना व हरकतींसाठी पाठवला आहे. तोपर्यंत उच्च न्यायालयाने कारवाई करण्यासंदर्भात दिलेल्या आदेशावर आम्ही स्थगिती मागत नाही. संबंधित बांधकामांवर न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कारवाई होईल,’ असे देव यांनी खंडपीठाला स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे उच्च न्यायालयाने दिघ्यातील बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई सुरू करण्याचा आदेश नवी मुंबई महापालिका, सिडको व एमआयडीसीला देत एक महिन्यात यासंबंधी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. मात्र सर्वोच्च न्यायालयाने संरक्षण दिलेल्या बांधकामांवर कारवाई होणार नाही, असेही खंडपीठाने स्पष्ट केले. (प्रतिनिधी) >उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही एकट्या नवी मुंबईत ४०० हून अधिक बेकायदा बांधकामे उभारण्यात आल्याची माहिती याचिकाकर्त्याच्या वकील अ‍ॅड. दत्ता माने यांनी खंडपीठाला दिली. यावरूनही खंडपीठाने राज्य सरकारला धारेवर धरले. ‘आदेशानंतर बेकायदेशीर बांधकामे उभी राहू नयेत, यासाठी केवळ या कामाकरिताच विशेष पोलीस नियुक्त करण्याचे निर्देश सरकारला दिले होते.