शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

...तर मुख्य सचिवांना समन्स बजावू

By admin | Updated: February 18, 2015 02:08 IST

राज्य शासनाच्या मुख्य सचिवांसह इतर प्रतिवादींना समन्स बजावू, अशी तंबी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी दिली.

नागपूर : मोटार अपघात दावा लवादातील न्यायाधीशांच्या कमतरतेविषयीच्या प्रकरणात ४ मार्चपर्यंत उत्तर सादर न केल्यास राज्य शासनाच्या मुख्य सचिवांसह इतर प्रतिवादींना समन्स बजावू, अशी तंबी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी दिली.नागपूर येथे लवादाची ८ अतिरिक्त न्यायपीठे स्थापन करण्यात यावीत व दोन न्यायपीठांतील रिक्त जागा भरण्यात याव्या, अशी मागणी करणारी याचिका राजेश गजघाटे यांनी दाखल केली. सध्या नागपुरात लवादाची ४ न्यायपीठे आहेत. न्यायालयाने या प्रकरणात २७ नोव्हेंबर २०१४ रोजी सर्व प्रतिवादींना नोटीस बजावली होती. तेव्हापासून प्रतिवादींनी अनेकदा वेळ घेऊनही उत्तर सादर केलेले नाही. यामुळे न्यायालयाने कडक भूमिका घेतली आहे. याचिकेत राज्य शासनाचे मुख्य सचिव, विधी व न्याय विभागाचे सचिव, गृह विभागाचे सचिव, वित्त विभागाचे सचिव आणि मुंबई उच्च न्यायालयाचे महाप्रबंधक यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.अपघातातील ठार व्यक्तींच्या वारसदारांना व गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींना महाराष्ट्र मोटर वाहन नियम-१९८९ अनुसार दावा दाखल केल्यानंतर ४५ दिवसांत तात्पुरती भरपाई, तर ६ महिन्यांत पूर्ण भरपाई मिळायला पाहिजे. परंतु प्रलंबित दाव्यांची संख्या मोठी असल्यामुळे तात्पुरती भरपाई मिळायलाच २ ते ३ वर्षे लागतात. पूर्ण दावा ६ ते ७ वर्षांनंतर निकाली निघतो. यामुळे पीडितांना उपजीविका चालविणे कठीण जाते. पैसे नसल्याने बरेचदा जखमी व्यक्तीचा मृत्यू होतो. लवादात सध्या सुमारे ८ हजार दावे प्रलंबित आहेत. दरवर्षी १,५०० वर नवीन दावे दाखल होतात. त्या तुलनेत दरवर्षी फार कमी दाव्यांवर अंतिम निर्णय होतो.