मुंबई : जोपर्यंत महाराष्ट्रात एमआयएमआयचे दहा ते पंधरा आमदार निवडून येत नाहीत आणि मुंबई दंगलीवरील श्रीकृष्ण अहवालातील आरोपींना शिक्षा होत नाही, तोपर्यंत एमआयएम गप्प बसणार नाही, असा इशारा अकबरुद्दीन ओवेसी यांनी वांद्रे पूर्व मतदारसंघात एमआयएमचे उमेदवार राहबार खान यांच्या प्रचारसभेत दिला. वांद्रे पूर्वेतील पोटनिवडणुक एमआयएमसाठी महत्वाची असल्याचे सांगतानाच ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना आणि काँग्रेसवर निशाणा साधला. नारायण राणे यांच्या ऐवजी कोणी मुस्लीम उमेदवार दिला असता तर एमआयएमने आपला उमेदवार दिला नसता असे सांगतानाच काँग्रेसला मुस्लिम उमेदवार मिळाला नाही का, असा सवाल ओवेसी यांनी केला. बाळासाहेब ठाकरेंमुळे राणे मुख्यमंत्री झाले आता ते वांद्रयाचे काँग्रेस उमेदवार आहेत. या पोटनिवडणुकीत राणे पडतील आणि त्याचे खापर काँग्रेसवाल्यांवर फोडतील. असा आरोप ओवेसी यांनी केला. (प्रतिनिधी)
...तोपर्यंत एमआयएम लढेल - अकबरुद्दीन ओवेसी
By admin | Updated: March 30, 2015 02:59 IST