शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

..तर ‘आश्वासनांचा गणपती बाप्पा’ची स्थापना

By admin | Updated: August 22, 2016 02:20 IST

विनाअनुदानित शिक्षक संघटनांनी बहुतेक शिक्षण उपसंचालक कार्यालयांत ‘आश्वासनांचा गणपती बाप्पा’ची प्रतिष्ठापना करण्याची घोषणा केली

मुंबई : राज्यातील विनाअनुदानित शिक्षक संघटनांनी बहुतेक शिक्षण उपसंचालक कार्यालयांत ‘आश्वासनांचा गणपती बाप्पा’ची प्रतिष्ठापना करण्याची घोषणा केली आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिक्षकांना गणेशोत्सवापूर्वी अनुदान देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र दिलेले आश्वासन ते पाळत नसल्याने गणपती बाप्पा त्यांना या वेळी सुबुद्धी देवो, असे साकडे गणपतीला घालणार असल्याचे आंदोलन प्रमुख मनोज पाटील यांनी सांगितले.शिक्षकांनी अनुदानासाठी केलेल्या तीव्र आंदोलनात गजानन खरात या शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तावडे यांनी गणेशोत्सवापूर्वी शिक्षकांना अनुदान मिळेल, असे आश्वासन दिलेले आहे. मात्र म्हणावी तितकी तत्परता अद्याप दिसत नाही आहे. परिणामी, जिल्हास्तरावर नैराश्यग्रस्त शिक्षकांनी एकत्रित येऊन ‘आश्वासित शिक्षक गणेश मंडळां’ची स्थापना केला आहे. आश्वासित मंडळातर्फे राज्यातील प्रत्येक शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर तीन दिवसांच्या गणपतीची प्रतिष्ठापना केली जाईल. शिवाय जिल्हा स्तरावर त्या-त्या संघटनांनी आत्तापर्यंत केलेल्या उपोषण, मोर्चा आणि धरणे आंदोलनांच्या छायाचित्रांचा वापर संबंधित मंडळ आरास म्हणून करेल. शिक्षणमंत्र्यांच्या आश्वासनांमुळे बहुतेक शिक्षक पडेल ते काम करीत आहेत. यासंबंधातील विडंबनात्मक सजीव देखावे काही ठिकाणी सादर करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)>प्रसादाला गाजर, रताळे, केळी!आश्वासित शिक्षक गणेश मंडळातर्फे शिक्षणमंत्री ज्या जिल्ह्यात असतील, त्या ठिकाणी त्यांना आरतीसाठी निमंत्रित केले जाईल. शिवाय प्रसाद म्हणून मंत्री महोदयांना गाजर, रताळे आणि केळी दिली जातील. शिक्षणमंत्र्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण केलेली नसल्याने हा विडंबनात्मक प्रसाद वाटावा लागणार असल्याचेही संघटनेने स्पष्ट केले.>अनुदान कशाला?गेल्या १० वर्षांहून अधिक काळापासून विनाअनुदानित शिक्षक शाळांवर अध्यापनाचे काम करत आहेत. शासनाने केलेल्या मूल्यांकनानंतर अनेक शाळा, तुकड्या या अनुदानास पात्र झाल्या आहेत. मात्र ते देण्यास शासन व शिक्षणमंत्री जाणूनबुजून दिरंगाई करत असल्याचा संघटनेचा आरोप आहे. अनुदानाअभावी शालेय पोषण आहार व पाठ्यपुस्तकांपासूनही विद्यार्थी वंचित आहेत. तर अनेक शिक्षकांना उदरनिर्वाहासाठी अध्यापनाव्यतिरिक्त मोलमजुरीची कामे करून कुटुंबाचा चरितार्थ चालवावा लागत आहे.