शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

...तर गणपतीत ‘काम बंद’चा चालकांचा इशारा

By admin | Updated: July 1, 2015 00:09 IST

एसटी महामंडळात तीन वर्षांपूर्वी भरती झालेल्या कनिष्ठ चालकांना त्यांच्या मूळ विभागात अद्यापही रुजू न केल्याने त्याच्या निषेध करीत ७२७ चालकांनी मंगळवारी मोर्चा काढला.

मुंबई : एसटी महामंडळात तीन वर्षांपूर्वी भरती झालेल्या कनिष्ठ चालकांना त्यांच्या मूळ विभागात अद्यापही रुजू न केल्याने त्याच्या निषेध करीत ७२७ चालकांनी मंगळवारी मोर्चा काढला. या मोर्चाचे नेतृत्व महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने केले. चालकांना मूळ विभागात रुजू न केल्यास गणेशोत्सव काळात काम बंद आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. परळ कामगार मैदान ते मुंबई सेंट्रल असा हा मोर्चा काढण्यात आला.एसटी महामंडळाने २0१२ साली चालक भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली होती. ही भरती त्या त्या विभागांकरिता होती. यात नगर, लातूर, सोलापूर, अमरावती, सातारा, धुळे, नाशिकमधील चालकांचा समावेश होता. २0१२ साली चालकांची भरती झाल्यानंतर २0१४ साली या चालकांची बदली चालकांची टंचाई असलेल्या मुंबई व कोकण विभागात करण्यात आली. त्यानंतर या चालकांना त्यांच्या विभागात पुन्हा रुजू करण्यात आले नाही. चालकांची कधीही राज्याकरिता भरती झालेली नाही. तसेच यातील कोणत्याही चालकाने मुंबई किंवा कोकणात नोकरी मिळावी, असा अर्ज केलेला नाही. असे असतानाही महामंडळाचे अधिकारी चालकांना दिलेली नेमणूक बरोबर असल्याचा कांगावा करीत असल्याचे महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसकडून सांगण्यात आले. महामंडळाच्या या कारभारामुळे ७२७ चालकांवर अन्याय झाला असून, ते भरती झालेल्या मूळ विभागात त्वरित बदली करावी, अशी मागणी युनियनकडून एसटी महामंडळाकडे या वेळी करण्यात आली. यासंदर्भात एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. या मागण्यांवर विचार करण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे एसटीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.