शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

..तर खासगी वैद्यकीय महाविद्यालयांवर फौजदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2016 03:21 IST

अभ्यासक्रमासाठी पैशांवर नव्हे तर गुणवत्तेवर प्रवेश दिला जाणार असल्याची मुख्यमंत्री फडवणीस यांनी ग्वाही दिली.

अकोला, दि. 0७- वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी नियमांची पायमल्ली करणारे, खोटे रेकॉर्ड दाखवून, पैसे घेऊन, धनदांडग्यांच्या मुलांना नियमबा पद्धतीने प्रवेश देत असतील, तर अशा वैद्यकीय महाविद्यालयांवर थेट फौजदारी करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेंतर्गत अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सवरेपचार रुग्णालयाच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे भूमिपूजन आणि शस्त्रक्रियागृहाचे (ओ.टी.) लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हय़ाचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील होते. तर अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, खासदार संजय धोत्रे व अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.मुख्यमंत्री म्हणाले, की वैद्यकीय शिक्षण सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले पाहिजे. या अभ्यासक्रमासाठी पैशांवर नव्हे तर गुणवत्तेवर प्रवेश मिळाला पाहिजे, हा आमचा प्रयत्न आहे; मात्र काही धनदांडग्यांची महाविद्यालये वैद्यकीय प्रवेशासाठी वारेमाप पैसे उकळतात, अशा अनेक तक्रारी सरकारकडे आल्या आहेत. गिरीश महाजन यांनी याबाबत मला कारवाईसाठी परवानगी मागितली असून, अशा महाविद्यालयांवर थेट फौजदारी करावाई करा, असे स्पष्ट निर्देश त्यांना देत आहे.महात्मा फुले जनआरोग्य योजना नोव्हेंबरमध्ये!शेतकरी आत्महत्यांमागे त्यांच्या घरातील आजारपण व त्याचा खर्च हेसुद्धा महत्त्वाचे कारण असल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच येत्या नोव्हेंबरमध्ये महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना सुरू करीत आहोत. या योजनेमध्ये तब्बल १२00 आजारांचा समावेश करण्यात आला असून, त्याचा लाभ शेतकर्‍यांना मोठय़ा प्रमाणात होईल. या योजनेत आठशे खासगी रुग्णालयांचा समावेश राहणार असून, ही योजना संपूर्णपणे कॅशलेस असेल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.